मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही, वर्षभराच्या संबंधानंतर नांदेडच्या महाराजाची पलटी; महिला शिष्याचा घात
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पीडिता दर गुरुवारी श्रद्धेने मठात दर्शनासाठी जात असे, तिने महाराजाला आपला 'गुरू' मानले होते.
नांदेड : नांदेडमधील धार्मिक क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. ज्याला 'गुरू' मानून श्रद्धेने शरण गेले, त्याच नराधम महाराजााने नात्याला आणि धर्माला तिलांजली देत एका विधवा महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नांदेड शहरात श्रद्धेचा गैरफायदा घेऊन एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील गाडीपुरा भागातील एका मठाचा मठाधिपती 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराज याने एका 46 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने या छळाला कंटाळून धाडस दाखवत पोलीस ठाणे गाठले, ज्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी या भोंदू महाराजाला बेड्या ठोकल्या आहेत.
advertisement
दर गुरुवारी श्रद्धेने मठात दर्शनाला
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मे 2025 मध्ये पहिल्यांदा गाडीपुरा येथील मठात गेली होती. तिथेच तिची ओळख हरिगिरी दत्तगिरी महाराज याच्याशी झाली. पीडिता दर गुरुवारी श्रद्धेने मठात दर्शनासाठी जात असे. तिने महाराजाला आपला 'गुरू' मानले होते. मात्र, या भोंदू महाराजाची नजर पहिल्यापासूनच वाईट होती. तो सतत फोनवरून पीडितेच्या संपर्कात राहून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता.
advertisement
वाढदिवासाच्या दिवशी केला अत्याचार
14 जुलै २०२५ रोजी या महाराजाचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे निमित्त साधून तो स्वतः पीडितेच्या घरी गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कोणालाही न सांगण्यासाठी त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. आपण लग्न करू असे आश्वासन देऊन त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. मात्र, जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा मी संन्यासी असल्याने लग्न करू शकत नाही, असे म्हणत त्याने हात झटकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.
advertisement
नांदेडमधील भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट
पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे नांदेडमधील भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 2:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही, वर्षभराच्या संबंधानंतर नांदेडच्या महाराजाची पलटी; महिला शिष्याचा घात







