advertisement

Maharashtra Kesari Final : महाराष्ट्र केसरीमध्ये आज फायनलचा थरार,सिकंदर शेखची महेंद्रशी लढत,हर्षवर्धनसमोर जय पाटीलच आव्हान, कोण बाजी मारणार?

Last Updated:

आता अवघ्या काही तासात महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळणार असून मानाच्या चांदीच्या गदेवर कोण नाव कोरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Maharashtra kesari final 2026
Maharashtra kesari final 2026
Maharashtra Kesari Final 2026 : पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेसाठी आजचा दिवस खुपच निर्णायक ठरणार आहे. कारण आता अवघ्या काही तासात महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळणार असून मानाच्या चांदीच्या गदेवर कोण नाव कोरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
यंदा माती विभागात हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.तर दुसरीकडे गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटीलय यांच्यात अंतिम फेरीत लढत पार पडणार आहे.
माती विभागाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सुरूवातीपासून आक्रामक पावित्रा घेऊन भारंदाज डावाच्या जोरावर सोलापूच्या रविराज चव्हाणवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सिकंदर शेखने बाजी मारली आहे. सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा गुण फरकानी पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सिकंदर शेखने अंतिम फेरीत धडक मारली होती.
advertisement
महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम फेरीत पु्न्हा एकदा हिंगोलीचा 'चपळ चिता' आणि सोलापूरचा बाहुबली महेंद्र गायकवाड हे दोन्ही मल्ल आमने सामने आले आहेत. यापुर्वी 2023 च्या स्पर्धेतही हो दोन्ही मल्ल माती विभागाच्या अंतिम लढतीत भिडले होते. मात्र त्यावेळी पंचाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदरला पराभव स्विकारावा लागून महेंद्र गायकवाड विजयी ठरला होता. यावरून राज्यभरातू टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महेंद्रला मुख्य अंतिम फेरीत शिवराज राक्षेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे आता 2023 च्या त्या वादाचा वचपा सिंकदर शेख काढणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
advertisement
विजेत्यांना काय बक्षीस मिळणार?
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari Final : महाराष्ट्र केसरीमध्ये आज फायनलचा थरार,सिकंदर शेखची महेंद्रशी लढत,हर्षवर्धनसमोर जय पाटीलच आव्हान, कोण बाजी मारणार?
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement