advertisement

लॅपटॉप स्लो चालतोय? एक रुपयाही खर्च न करता चालेल सुपरफास्ट, करा ही सेटिंग 

Last Updated:

पर्सनल कामं असो, शैक्षणिक असो किंवा मग ऑफिसचं काम असो. सर्व कामांसाठी लॅपटॉप हा गरजेचा झालाय. पण महत्त्वाच्या कामावेळी लॅपटॉप स्लो चालत असेल तर खिप चिडचिड होते.

लॅपटॉप स्पीड
लॅपटॉप स्पीड
Laptop Speed Increase Tips: विविध कामांसाठी लॅपटॉपचा वापर सर्वच लोक करत असतात. पण अनेकदा लॅपटॉप हा खुपच स्लो चालतो. महत्त्वाचं काम सुरू असेल आणि लॅपटॉप स्लो झाला तर खुप टेन्शन होतं. पण असं होत असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण लॅपटॉप स्लो चालतोय म्हणजे नवा खरेदी करावा लागेल किंवा रिपेयर करावा लागेल असं नसतं. तुम्ही सोप्या ट्रिक्सनेही तो दुरुस्त करू शकता. अनेकदा लहान-लहान सेटिंग्स आणि स्वच्छता देखील तुमची जुनी सिस्टम पुन्हा वेगवान आणि स्मूथ करते. चला जाणून घेऊया काही सोप्या ट्रिक्स ज्यामुळे तुमचा लॅपटॉप परफॉर्मेंस पुन्हा सुपरफास्ट होऊ शकतो.
लॅपटॉप स्लो का होतो?
लोकांना वाटतं की, लॅपटॉप खराब झाला म्हणजे हे हार्डवेयरमुळे होत असेल. पण प्रत्येकवेळी असं होत नाही. अनेक प्रकरणांमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालत असलेल्या अनावश्यक अ‍ॅप्स, फूल स्टोरेज आणि जंक फाइल्समुळे सिस्टम स्लो होते. म्हणूनच वेळेबरोबर लॅपटॉपची स्पीड कमी होते.
advertisement
स्टार्टअप अ‍ॅप्स कंट्रोल करणे गरेजेचे 
  • लॅपटॉप ऑन करतो तेव्हा अनेक अ‍ॅप्स आपोआप सुरू होतात आणि सिस्टमचा लोड वाढतो.
  • Task Manager (Ctrl + Shift + Esc) ओपन करा .
  • Startup टॅबमध्ये जा.
  • गरज नसलेले अ‍ॅप्स Disable करा.
  • यामुळे तुमचा लॅपटॉप वेगाने बूट होईल आणि सुरुवातीलाच सिस्टमवर दबाव येईल
advertisement
जंक फाइल्स आणि कॅशे क्लियर करा 
  • लॅपटॉपमध्ये टम्पररी फाइल्स आणि कॅश जमा होतात, ज्यामुळे स्टोरे फूल होते.
  • सर्च बारमध्ये Disk Cleanup लिहा.
  • मुख्य ड्राइव्हमधून अनावश्यक फाइल्स काढून टाका.
  • ब्राउझर हिस्ट्री आणि कुकीजही क्लियर करा.
  • हार्ड ड्राइव्ह जास्त भरली असल्यास, जुन्या फाइल्स क्लाउड किंवा एक्सटर्नल ड्राइव्हमध्ये शिफ्ट करा.
व्हिज्युअल इफेक्ट्स कमी करा, स्पीड वाढवा :  विंडोजच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स दिसायला चांगला वाटतात, पण जुन्या लॅपटॉपवर ओझं बनतात. System Properties मध्ये जा. ‘Adjust for best performance’ ऑप्शन निवडा.  पॉवर सेटिंग्समध्ये ‘Best Performance’ मोड ऑन करा. यामुळे लॅपटॉपची स्पीड सुधारेल, पण लूक थोडा सिंपल दिसेल.
advertisement
सॉफ्टवेयर अपडेट आणि स्वच्छता गरजेची : फक्त सेटिंग्स बदलणे पुरेसे नाही. लॅपटॉपची देखरेखही गरजेची आहे. वेळोवेळी OS आणि ड्रायव्हर्स अपडेट करा. व्हेंट्स आणि फॅनमधील धूळ स्वच्छ करा. यामुळे लॅपटॉप ओव्हरहिट होणार नाही आणि परफॉर्मेंस टिकून राहील. तुमचा लॅपटॉप स्लो झाला असेल तर सर्वात आधी लहान-लहान उपाय अवश्य करा. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये यामुळेच काम होते आणि तुम्हाला नवा लॅपटॉप खरेदी करायची गरज पडत नाही. थोडीशी काळजी आणि योग्य सेटिंग्स केल्याने तुमची सिस्टम पुन्हा नव्यासारखी काम करेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
लॅपटॉप स्लो चालतोय? एक रुपयाही खर्च न करता चालेल सुपरफास्ट, करा ही सेटिंग 
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement