advertisement

माजलगावात दिवसाढवळ्या डल्ला! स्विफ्ट कारच्या सीटवरून 1 लाख रुपये घेऊन चोरटा फरार

Last Updated:

अज्ञात चोरट्याने गाडीत कोणीही नसल्याची संधी साधली आणि शिताफीने गाडीतील पैशांची बॅग घेऊन पळ काढला.

News18
News18
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भरदिवसा चोरीची एक धाडसी घटना समोर आली आहे. परभणी चौकासारख्या गजबजलेल्या भागात उभ्या असलेल्या कारमधून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपयांची रोकड लंपास केली असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून माजलगाव ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
माजलगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या परभणी चौकात चोरट्यांनी पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे. हॉटेलसमोर लावलेल्या स्विफ्ट डिझायर कारचा दरवाजा उघडून किंवा लॉकचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सीटवर ठेवलेली 1 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना भरदिवसा घडल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा माग काढत आहेत.
advertisement

नेमकी घटना काय?

मोगरा येथील रहिवासी असलेल्या सुमन खंडू झेटे या आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीने माजलगावला आल्या होत्या. परभणी चौकातील प्रसिद्ध 'मोरेश्वर' हॉटेलसमोर त्यांनी आपली गाडी उभी केली होती. गाडीच्या सीट कव्हरमध्ये एका कॅरीबॅगमध्ये त्यांनी 1 लाख रुपयांची नगदी रक्कम ठेवली होती. गाडी लॉक करून त्या काही कामासाठी हॉटेलच्या परिसरात गेल्या असता अज्ञात चोरट्याने गाडीत कोणीही नसल्याची संधी साधली आणि शिताफीने गाडीतील पैशांची बॅग घेऊन पळ काढला.
advertisement

सीसीटीव्हीत कैद झाला थरार

सुमन झेटे काही वेळाने गाडीजवळ परतल्या असता, त्यांना गाडीतील पैशांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यात संशयित चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. या फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
advertisement

पोलिसांची कारवाई

याप्रप्रकरणी सुमन खंडू झेटे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गाडीत मोठ्या प्रमाणात रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवणे टाळावे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजलगावात दिवसाढवळ्या डल्ला! स्विफ्ट कारच्या सीटवरून 1 लाख रुपये घेऊन चोरटा फरार
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement