advertisement

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात भूकंप! एका आठवड्यात चांदी ३२००० ने स्वस्त, सोन्याचा दर काय?

Last Updated:

Gold Silver Price: जागतिक बाजारपेठेत सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर झाला आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतींनी (Gold-Silver Rates) गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला.

सोनं-चांदीच्या दरात मोठा क्रॅश, चांदी ३२ हजारांनी स्वस्त, सोनं किती रुपयांवर घसरलं? पटापट चेक करा दर
सोनं-चांदीच्या दरात मोठा क्रॅश, चांदी ३२ हजारांनी स्वस्त, सोनं किती रुपयांवर घसरलं? पटापट चेक करा दर
मुंबई: जागतिक बाजारपेठेत सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर झाला आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतींनी (Gold-Silver Rates) गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला. सहसा युद्धाच्या किंवा जागतिक तणावाच्या काळात सोन्या-चांदीचे दर वाढतात, मात्र मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याउलट चित्र पाहायला मिळत आहे. सोनं-चांदी या मौल्यवान धातूंचे दर जोरदार कोसळले आहेत.

चांदीच्या दरात विक्रमी 'क्रॅश'

गेल्या केवळ पाच व्यापारी दिवसांत चांदीच्या किमतीत मोठी पडझड झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १३ मार्च रोजी चांदीचा दर प्रति किलो २,५९,४३५ रुपये होता, जो शुक्रवारी २,२७,४७० रुपयांवर बंद झाला. म्हणजेच एका आठवड्यात चांदी तब्बल ३१,९६५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. २९ जानेवारी रोजी चांदीने ४.२० लाख रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता, त्या तुलनेत आता चांदी चक्क १,९२,५७८ रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
advertisement

सोनंही झालं स्वस्त

चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही मोठी सुस्ती पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३,६४१ रुपयांनी घसरला आहे. १३ मार्च रोजी सोन्याचा दर १,५८,४६६ रुपये होता, जो शुक्रवारी १,४४,८२५ रुपयांवर स्थिरावला. सोन्याने जानेवारीत १,९३,०९६ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, आता तो दर ४८,२७१ रुपयांनी कमी झाला आहे.
advertisement

घसरणीचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेतील मागणीत झालेली घट आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीकडे (Profit Booking) वळवलेला कल यामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे. ग्राहकांसाठी मात्र ही खरेदीची मोठी संधी मानली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात भूकंप! एका आठवड्यात चांदी ३२००० ने स्वस्त, सोन्याचा दर काय?
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement