Ulhasnagar Crime : गोव्याची गाडी, उल्हासनगरचं नो- पार्किंग; दंड भरायला गेला अन् पोलीस कोठडीत पोहोचला
Last Updated:
Crime News : उल्हासनगरमध्ये नो-पार्किंगमध्ये उभी असलेल्या दुचाकीवर ई-चालान झाल्याने गोव्यातून एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. आरोपीला पोलिसांनी ओळखताच अटक केली आणि थेट पोलीस कोठडीत पाठवले.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर काढलेल्या ई-चालानामुळे एक मोठा गुन्हा समोर आलेला आहे. या कारवाईमुळे थेट गोव्यातून चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून सराईट चोरट्यालाही अटर करण्यात आलेली आहे.
नेमकं घडलं काय?
उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचे हवालदार संतोष भोईर यांनी परिसरातील नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीवर ई-चालान केले. त्याच दरम्यान कारवाईचा झाल्याचा मेसेज हा त्या दुचाकीचे मूळ मालक ओंकार भरजे यांना कोल्हापुरमध्ये मिळाला. तेव्हा त्यांनी लगेच जाऊन पोलिसांशी संपर्क केला आणि ती दुचाकी गोव्यातून चोरीला गेल्याची माहिती दिली.
या प्रकरणानंतर हवालदार भोई आणि वॉर्डन उज्जैनकर यांनी लगेच तपास सुरु केला आणि संशयिता शोध घेता घेता पोलिसांना पाहताच आरोपी सोन्या ऊर्फ आदित्या घुडे याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे आरोपीने पोलिसावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र जखमी झालेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.
advertisement
पोलिसांनी अटक केला सोन्या घुडे हा मुरबाडमधील एका गावचा रहिवासी आहे. विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 2:36 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ulhasnagar Crime : गोव्याची गाडी, उल्हासनगरचं नो- पार्किंग; दंड भरायला गेला अन् पोलीस कोठडीत पोहोचला










