Maharashtra Kesari : अंतिम फेरीआधी सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया, मानाची गदा कोण उचलणार? हिंगोलीचा 'चपळ चिता' स्पष्टच बोलला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अंतिम फेरीआधी हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेखने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Kesari Final 2026 : पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत आज फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. कारण अवघ्या काही तासात महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरी मिळणार असून मानाचा गदा कोण उचलणार? याच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान या अंतिम फेरीआधी हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेखने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यंदा माती विभागात हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.तर दुसरीकडे गादी विभागात नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम फेरीत लढत पार पडणार आहे.
दरम्यान या अंतिम फेरीआधी सिकंदर शेखने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ही प्रत्येक वर्षी येत राहणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा मी जिंकावी किंवा कुणीही जिंकावी. पण माझी अशी इच्छा की आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र केसरीची ही गदा मला मिळावी, अशी इच्छा सिकंदर शेखने व्यक्त केली. तसेच आमच्या वस्तादांना आनंदाचा क्षण द्यावा. तसेच सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आहे त्याबद्दल धन्यवाद, असे सिकंदर शेखने म्हटले आहे.
advertisement
खरं तर मी महाराष्ट्र केसरी किताब 2020 साली जिंकला आहे.पण तेव्हापासून मी डबल महाराष्ट्र केसरीसाठी प्रयत्न करतो आहे.एकदा फायनलपर्यंत पोहोचलो होतो.त्यानंतर आता गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी माझ्याकडून वेगळ्या प्रमाणात प्रॅक्टीस करून घेतलेली. काही दिवस पंजाबमध्ये येतो.थोड्या वेगळ्या प्रकारे प्रॅक्टीस करून घेतली. त्याच्याआधी दोन वर्ष मातीतून लढलो.आणि परत एकदा मॅटचा निर्णय घेतला आहे आणि एक उत्तम प्रॅक्टीस करूनच मी मैदानात उतरलो आहे,असे पैलवान हर्षवर्धन सदगीर म्हणाला आहे.
advertisement
दरम्यान महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम फेरीत पु्न्हा एकदा हिंगोलीचा 'चपळ चिता' आणि सोलापूरचा बाहुबली महेंद्र गायकवाड हे दोन्ही मल्ल आमने सामने आले आहेत. यापुर्वी 2023 च्या स्पर्धेतही हो दोन्ही मल्ल माती विभागाच्या अंतिम लढतीत भिडले होते. मात्र त्यावेळी पंचाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदरला पराभव स्विकारावा लागून महेंद्र गायकवाड विजयी ठरला होता. यावरून राज्यभरातू टीकेची झोड उठली होती. त्यानंतर महेंद्रला मुख्य अंतिम फेरीत शिवराज राक्षेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे आता 2023 च्या त्या वादाचा वचपा सिंकदर शेख काढणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 2:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : अंतिम फेरीआधी सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया, मानाची गदा कोण उचलणार? हिंगोलीचा 'चपळ चिता' स्पष्टच बोलला








