Weekly Numerology: साप्ताहिक अंकशास्त्र! मार्चच्या चौथ्या आठवड्यात 3 मूलांकाना लॉटरी, अलर्ट कोणाला
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: मार्च महिन्याचा चौथा आठवडा अनेक मूलांकासाठी काळजी करायला लावणारा आहे, आर्थिक गोष्टींसाठी खबरदारी घ्यावी लागेल, खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल. या आठवड्यात काही मूलांकाना भाग्याचे योगही आहेत. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सर्व 1 ते 9 मूलांकांचे साप्ताहिक अंकशास्त्र जाणून घेऊ.
अंक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)या आठवड्यात आपल्याला आर्थिक स्थिरता राखणे गरजेचे आहे, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेता येऊ शकतील. घर घेणे किंवा इतर कोणतीही मोठी गुंतवणूक करणं सध्याच्या काळात योग्य ठरणार नाही, ती मोठी रिस्क ठरू शकते. त्यापेक्षा ती रक्कम सुरक्षित ठेवूनच गरजेचे आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न वाढवणे गरजेचे आहे. तुम्हाला घरातील लोकांची साथ मिळेल. या आठवड्यात घरात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही, स्पष्ट आणि समझुतीने निर्णय घ्या ज्यामुळे कोणत्याही चुका होणार नाहीत.
advertisement
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)मार्चच्या चौथ्या आठवड्यामध्ये आर्थिक निर्णय हुशारीने घेणे गरजेचे आहे. तुम्ही एकटे देखील हे करू शकता पण इतरांची मदत मिळत असल्यास उत्तम. कौटुंबिक जीवन स्थिर करण्यासाठी त्याचा फायदा होईल. कदाचित या आठवड्यात तुमचा जोडीदार योग्य अयोग्य यातला फरक नीट समजू शकणार नाही. पण रागावण्यापेक्षा शांतपणे समजून सांगणे गरजेचे आहे. कठीण काळात एकमेकांना साथ देणे गरजेचे असेल. या आठवड्यात वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाची निर्णय घेतले जातील त्याचा परिणाम नोकरी व्यवसायावर होऊ शकेल. कधी कधी फार विचार न करता दैनंदिन कामे योग्य पद्धतीने करत राहणे फायदेशीर पडते. या आठवड्यात हितचिंतक अनेक सल्ले देतील, पण तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकावं लागेल.
advertisement
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)आर्थिक आघाडीवर हा काळ चढउतारांचा असेल, पैसे सेविंग राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक कामाचे रिझल्ट लगेच मिळतील, अशी आशा आहे आठवड्यात करू नका. रिलेशनमध्ये जबरदस्तीने काही मिळत नसते, त्यासाठी वेळ द्यावा लागतो हे तुमच्या लक्षात येईल. आवडणारी व्यक्ती कदाचित नाही म्हणाली तरी निराश होऊ नका. प्रपोज करून पहा, पण नाही जमलं तरी निराश होऊ नये. या आठवड्यात आयुष्य तुमची कल्पनेपेक्षा जास्त मार्गांनी परीक्षा घेईल. निगेटिव्ह विचार टाळण्यासाठी एकच उपाय म्हणजे जवळच्या लोकांसोबत मिळून भविष्याची नियोजन पक्के करावे.
advertisement
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल, या आठवड्यात तुम्हाला जास्तीत जास्त पैसा वाचवावा लागेल. उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व बिकट परिस्थितींना तोंड द्यावेच लागेल. या आठवड्यात तुम्हाला दोन-तीन प्रकल्पांवर एकाच वेळी काम करावे लागू शकते, या कामांमध्ये पूर्ण झोकून देत प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यात त्यामुळे आर्थिक स्थिरता कायमस्वरूपीसाठी मिळू शकते. तुम्हाला समजून घेणारी आणि तुमची काळजी घेणारी व्यक्ती तुमच्या सोबत आहे हा एक आशीर्वाद समजा. या आठवड्यात कामे प्रामाणिकपणे करावी लागतील, प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे हे मनात स्पष्ट ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, त्यासाठी खूप धैर्याची गरज असते, हे या आठवड्यात तुम्हाला समजेल.
advertisement
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)खर्च करताना हात आकडता घ्यावा लागेल, या आठवड्यात उधळपट्टी महागात पडू शकते. बचत करण्याचे धोरण अजिबात चुकू देऊ नका, टेन्शन टाळण्यासाठी आर्थिक शिस्त बिघडू न देणे सर्वोत्तम ठरेल, आर्थिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्या लागतील. हा आठवडा आर्थिक बाबींसाठी पुनर्विचार करण्यासाठी चांगला आहे योग्य ते बदल आता करून घेऊ शकता. रिलेशनमध्ये वाद टाळून प्रगल्भपणे विचार करत नाते अधिक दृढ करण्याची गरज आहे. आळस झटकून या आठवड्यात कामे पटापट उरकून घ्यावी लागतील, आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी कष्ट करण्याला पर्याय नाही. आपले टार्गेट विसरू नका त्यावर फोकस ठेवून काम करत राहा, कोणालाही बोलण्याची संधी देऊ नका. या आठवड्यामध्ये कामाच्या बाबतीत स्वतःच्या आंतरज्ञानावर विश्वास ठेवून टारगेट पूर्ण करावे लागतील.
advertisement
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी छोट्या छोट्या अपयशांना घाबरण्याची गरज नाही, या आठवड्यात काही त्रासदायक गोष्टी घडल्या तरी खचून न जाता मोठे टारगेट पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. पैसे खर्च करताना सेविंग मोडली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. आठवड्यात जोडीदाराशी बोलताना मोकळेपणा ठेवा म्हणजे कोणत्याच गोष्टीचे दडपण येणार नाही, सर्व गोष्टी विचार विनिमय करून करणे कदापि योग्य ठरते. कामात काही बदल करून पुढे जावे लागेल. छोटी पण महत्त्वाची पावले या आठवड्यात उचलायला लागतील.
advertisement
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)या आठवड्यात घाई घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊन चालणार नाही, आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी पैशांचे नियोजन करून त्या करावे लागेल अन्यथा महत्त्वाच्या प्रसंगात पैसे नसतील. घरात अचानक वादाचे प्रसंग उद्भवू शकतात, वादावाद जास्त ताणून धरणे योग्य ठरत नाही. जोडीदाराशी प्रेमाने आपुलकीने वागलेच फायद्याचे ठरेल याच मार्गाने आपण एकत्रितपणे चांगले भविष्य घडवू शकतो. रोजच्या कामांमध्ये टंगळमंगळ करून चालणार नाही, भाग्याचे दार उघडे राहण्यासाठी आळस झटकून काम करत राहावे लागेल. प्रयत्नांमध्ये शिस्तबद्ध रहा त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसून येतील.
advertisement
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)आपल्याला या आठवड्यात काही आर्थिक आव्हाने त्रास देऊ शकतात, घाई घाईत कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका. नाहक छोटे छोटे खर्च करणे टाळावे लागेल, आठवड्यात आर्थिक शिस्त गरजेची आहे. नोकरी, व्यवसाय चांगला चालण्यासाठी घरगुती वातावरण आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सगळ्या गोष्टी मनासारख्या होणार नसल्याने नाराज न होता, त्यावर हुशारीने मार्ग काढावे लागतील. या आठवड्यात स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिक स्थिती चांगली राहण्याची काळजी घ्या. काही गोष्टी चौकटी बाहेर जाऊन कराव्या लागतील त्यासाठी थांबू नका.
advertisement
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)टारगेट पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुम्ही उत्साहाने काम कराल, कामाला तुमचे 100% प्रयत्न द्याल. मोठ्या नियोजनासाठी छोटे छोटे गोष्टींमध्ये कुठे कसे पैसे खर्च होत आहेत याचा अंदाज घेणे गरजेचे आहे. त्यातून एक चांगली आर्थिक शिस्त निर्माण होईल. सध्या स्थिती बिकट असली तरी बचत करण्याचे मार्ग बदलण्याची गरज नाही. या आठवड्यात कामात काही वेगळे प्रयत्न बदल करावे लागतील, परिस्थितीला दोष देण्यापेक्षा त्याच्यावर उपाय करणे गरजेचे आहे, नवीन कौशल्य शिकावी लागतील, समजून घ्यावी लागतील, स्वतःमध्ये सुधारणा कराव्या लागतील, त्याची तयारी ठेवा.









