Virat Kohli : आयपीएलच्या ब्रेकवेळी लंडनला जायचंय... चार्टर प्लेनची डिमांड? विराट कुणावर भडकला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 19व्या हंगामाचा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 19व्या हंगामाचा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे, पण या सामन्याआधीच विराट कोहलीबद्दलचं एक वृत्त प्रसिद्ध झालं. विराट कोहलीने आरसीबीकडून आयपीएल मॅच दरम्यान ब्रेक असतील तेव्हा भारतातून लंडनला जाण्यासाठी चार्टर फ्लाईटची मागणी केली होती, असं वृत्त 'वर्ल्डइनलास्ट 24 हवर्स' नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली होती.
आयपीएल सामन्यांदरम्यान जर तीन पेक्षा जास्त दिवसांचं अंतर असेल तर कोहली लंडनला जाईल आणि मॅचच्या ठीक आधी परत येईल, असा दावाही या पोस्टमध्ये केला गेला होता. विराट कोहलीने या पोस्टचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर हसणारी इमोजी पोस्ट केली होती. विराटने हा स्क्रीनशॉट इमोजीसह शेअर करून या वृत्ताचं खंडन केलं आहे. काही वेळानंतर विराटने ही पोस्ट डिलीट केली.
advertisement

भारताच्या टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट आता फक्त वनडे आणि आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2026 आधी विराटने आरसीबीच्या पहिल्या ट्रेनिंग सेशनवेळी भारतीय खेळाडूंच्या छोट्या ग्रुपला संबोधित केलं आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
काय म्हणाला विराट?
advertisement
'आम्ही मागच्या दोन-तीन मोसमांपासून खूप मेहनत केली आहे. आता हे आणखी कठीण होणार आहे, कारण दुसऱ्या टीमही आपल्याविरुद्ध पूर्ण तयारी करून उतरणार आहे. आपण हे दिवस फुकट घालवू शकत नाही. आपल्याला सगळ्यांच्या पुढे राहावं लागणार आहे, त्यामुळे पूर्णपणे तयार व्हा. आपण ज्या सेशनमध्ये असू, त्यातलं एक मिनिटही फुकट घालवू नका. पुढचे अडीच महिने 120 टक्के द्या', असं विराट कोहली म्हणाला आहे. आयपीएल इतिहासात विराट कोहली हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Mar 22, 2026 5:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : आयपीएलच्या ब्रेकवेळी लंडनला जायचंय... चार्टर प्लेनची डिमांड? विराट कुणावर भडकला!










