आदिनाथ महाराजांनी गुप्तांगावर का वार केले? 7 दिवसांनी स्वत:च दिली धक्कादायक माहिती, म्हणाले मी...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
स्वतःच्या गुप्तांगावर वार करून घेतल्याच्या घटनेनंतर सात दिवसांनी महाराजांनी दिलेली प्रतिक्रियेने या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्याबाबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्वतःच्या गुप्तांगावर वार करून घेतल्याच्या घटनेनंतर सात दिवसांनी महाराजांनी दिलेली प्रतिक्रियेने या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे.
श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे दुसरे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महाराजांवर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती सुधारल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, जो काही जननेंद्रियाचा त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला, कोणाचाही काहीच त्रास नाही, त्यांच्या खुलाशामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.
advertisement
नेमका प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी तारकेश्वर गडावरील स्वतःच्या खोलीत महाराज रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. त्यांनी स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमागे काही दबाव होता का? की हे कृत्य कोणत्या धार्मिक भावनेतून केले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, महाराजांनी कोणावरही आरोप न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
advertisement
गडावर गर्दी न करण्याचे आवाहन
महाराजांची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील आठवडाभर कोणत्याही भक्ताने महाराजांची भेट घेऊ नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज असून, प्रकृती पूर्णपणे सुधारेपर्यंत गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनानेही केले आहे.
आमदार संग्राम जगताप काय म्हणाले?
advertisement
आदिनाथ महाराज शास्त्री यांच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि व्यवस्थित आहे. उपचारानंतर ते आज सुखरूपपणे गडावर परत जात असून त्यांच्या आगमनामुळे भक्तांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
टोकाच्या निर्णयामुळे भक्त चिंतेत
14 मे 2011 रोजी गडाचे पहिले महंत नारायण महाराज यांच्या निधनानंतर आदिनाथ शास्त्री महाराज गादीवर विराजमान झाले होते. तेव्हापासून गडाचा विकास, आळंदी-पंढरपूर दिंडी सोहळा आणि धार्मिक सप्ताहांची जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे भक्त परिवारात चिंतेचे वातावरण आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 5:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आदिनाथ महाराजांनी गुप्तांगावर का वार केले? 7 दिवसांनी स्वत:च दिली धक्कादायक माहिती, म्हणाले मी...








