advertisement

VIDEO : चल निघ..., सराव सामन्यात ईशान किशनला नवखा खेळाडू भिडला, IPL आधीच मोठा राडा

Last Updated:

टीम इंडियाच्या ईशान किशन एका नवख्या खेळाडूने अॅक्शन करत पव्हेलियनकडे जाण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे मैदानात वातावरण तापले होते आणि मोठा राडा झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Ishan kishan send off Zishan ansari
Ishan kishan send off Zishan ansari
IPL 2026 : येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सूरूवात होत आहे. या हंगामाआधी सर्वच संघ मैदानात प्रचंड घाम गाळताना दिसत आहे. या दरम्यान खेळाडुंमध्ये इंट्रा स्क्वॉड सामने देखील खेळवले जात आहेत. या सामन्यात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. टीम इंडियाच्या ईशान किशन एका नवख्या खेळाडूने अॅक्शन करत पव्हेलियनकडे जाण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे मैदानात वातावरण तापले होते आणि मोठा राडा झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर सनरायझर्स हैदरबादचा नुकताच इंट्रा स्क्वॉड सामना पार पडला.या सामन्यात झिशान अन्सारीने ईशान किशनला आऊट केल्यानंतर जोरदार आक्रामक सेलिब्रेशन केले होते.त्यामुळे मैदानात गरमागरमी झाली होती. ही घटना सनरायझर्स बी च्या डावाच्या आठव्या ओव्हर दरम्यान घडलेली. त्यावेळेस ईशान किशन आणि लियाम लिविंगस्टोन क्रीजवर खेळत होते आणि वेगाने धावा काढत होते.
advertisement
या दरम्यान झिशान अन्सारी गोलंदाजीला येताच ईशान किशनने त्याच्या ओव्हरला 20 धावा काढल्या. पण नंतर झिशानने शेवटच्या बॉलवर ईशान किशनला आऊट केले होते. पण इस्ट्रा स्क्वॉड सामना म्हटलं तर सेलिब्रेशन होत नाही.पम झिशानने ईशानची विकेट काढताच त्याा हातवारे करत चल निघ..असे करत पव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला होता.या दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये थोडासा संवादही झाला. त्यामुळे मैदानात वातावरण तापलं होतं.दरम्यान ही घटना ईशान किशनने गांभिर्याने न घेता हसून वाद टाळला होता.त्यामुळे मोठी घटना टळली होती.
advertisement
advertisement
दरम्यान या सामन्यात ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी केलीय. अभिषेक शर्माने सनरायझर्स अ संघासाठी ओपनिंग करताना 94 धावांची वादळी खेळी, तर ईशान किशनने सनरायझर बी साठी 24 बॉलमध्ये 72 धावांची खेळी केली होती.
यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स अद्याप संघात उपस्थित राहु शकला नसल्याने ईशान किशन सुरुवातीच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच नेतृत्व करताना दिसणार आहे, तर अभिषेक शर्मा हा उप कर्णधार असणार आहे.
advertisement
सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना हा 28 मार्च 2026 ला गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसोबत असणार आहे. हा सामना बंगळुरूत खेळवला जाणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : चल निघ..., सराव सामन्यात ईशान किशनला नवखा खेळाडू भिडला, IPL आधीच मोठा राडा
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement