advertisement

तस्करांचा 'मास्टरप्लॅन' फसला! टँकरमध्ये दडलं होतं गुपीत; पोलिसांची शक्कल अन् डाव उधळला

Last Updated:

वरून पाहिल्यास टँकर सामान्य वाटत असला, तरी आतमध्ये दारूचे बॉक्स लपवण्यासाठी  जागा बनवण्यात आली होती.

News18
News18
संतोष दळवी, प्रतिनिधी
मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिसांनी आंतरराज्य दारू तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गोव्याहून गुजरातच्या दिशेने निघालेला आणि विशेष जागा असलेला एक टँकर पोलिसांनी वारे परिसरात अडवून तब्बल 72 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अमली पदार्थ आणि अवैध दारू तस्करी विरोधात मोठी मोहीम उघडली आहे. गुप्त माहितीच्या आधारे नेरळ पोलिसांनी वारे गावच्या हद्दीत सापळा रचून एका संशयास्पद टँकरची झडती घेतली असता, त्यात चक्क 72 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. दुधाचा किंवा तेलाचा टँकर असल्याचे भासवून त्यात दारूची तस्करी केली जात होती, मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला आहे.
advertisement

टँकरमध्ये दारुसाठी विशेष जागा

तस्करांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी टँकरमध्ये विशेष दोन कप्पे तयार केले होते. वरून पाहिल्यास टँकर सामान्य वाटत असला, तरी आतमध्ये दारूचे बॉक्स लपवण्यासाठी  जागा बनवण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपासणी केली असता, त्यात 'एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की' आणि 'मोबी व्होडका ऑरेंज' या नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचा मोठा साठा सापडला. या संपूर्ण मद्यसाठ्याची बाजारपेठेतील किंमत 72 लाख रुपये इतकी आहे.
advertisement

राजस्थानचा चालक अटकेत

या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक लादुराम बिश्नोई (रा. राजस्थान) याला घटनास्थळावरून अटक केली आहे. हा मद्यसाठा गोव्याहून भरला होता आणि तो गुजरात राज्याकडे नेला जात होता, अशी प्राथमिक माहिती आरोपीने दिली आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने तिथे या मद्याला चढ्या दराने विकण्याचा तस्करांचा कट होता.

तस्करीमागे नेमका कोणाचा हात? 

advertisement
एक टँकर अवैध मद्य घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वारे येथे नाकाबंदी करून हा टँकर पकडण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी टँकरसह 72 लाखांची दारू असा एकूण कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गुजरातमध्ये होते दारूची तस्करी

advertisement
गुजरातमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे या राज्यांत हजार कोटी रुपयांच्या दारूची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. पोलिस  दारू जप्त करतात. परंतु माफिया, भ्रष्ट पोलिस, भ्रष्ट राजकारण्यांच्या संगनमताने तीन ते चार पट जास्त नफा मिळवून बेकायदा दारू व्यवसाय सुरू आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह दमण-दीव येथूनही येथे दारू येते. हरयाणा, पंजाब, दिल्ली, गोवा येथून पार्सलद्वारे महागडी दारू येते. सीमावर्ती भागात दारू सर्वाधिक किमतीला विकली जाते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
तस्करांचा 'मास्टरप्लॅन' फसला! टँकरमध्ये दडलं होतं गुपीत; पोलिसांची शक्कल अन् डाव उधळला
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement