TRENDING:

No Milk Paneer Recipe : तुम्ही कधी भोपळ्याचं पनीर खाल्लंय? प्रोटीन रिच, व्हीगन डाएटसाठी बेस्ट! पाहा सोपी प्रोसेस

Last Updated:

How To Make Paneer Without Milk : आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळा आणि शेंगादाण्याचे पनीर कसे बनवायचे ते सांगणार आहोत. हे पनीर बनवणंही खूप सोपं आहे आणि यामध्येही प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दुधाचं पनीर सर्वजण खातात. ते घरी बनवणंही सोपं आहे. हल्ली लोक पनीरप्रमाणेच टोफूदेखील मोठ्या परमानावर खात आहेत. टोफू हे सोयाबीनपासून बनवलं जातं. पनीर आणि टोफू दोन्हींमध्येही प्रोटीनचं प्रमाण खूप असतं. म्हणून ते आपल्या आहारात असलंच पाहिजे. पण तुम्हाला या दोन्हींपेक्षाही काहीतरी वेगळं खायचं असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी.
शेंगदाणे आणि भोपळ्याचं पनीर कसे बनवायचं?
शेंगदाणे आणि भोपळ्याचं पनीर कसे बनवायचं?
advertisement

आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळा आणि शेंगादाण्याचे पनीर कसे बनवायचे ते सांगणार आहोत. हे पनीर बनवणंही खूप सोपं आहे आणि यामध्येही प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच दुधाचं पनीर आणि टोफूसोबत तुम्ही आता हे पनीरदेखील खाऊ शकता.

शिवाय हे पनीर दुधापासून बनत नाही, पूर्णपणे वनस्पतीपासून बनते, त्यामुळे हे व्हीगन डाएट करणाऱ्या लोकांसाठीही बेस्ट आहे. ही रेसिपी unicorn.202009 या इंस्टाग्राम अकाउंटवर शेर केली गेली आहे. चला पाहूया दुधी भोपळा आणि शेंगदाणे वापरून पनीर कसे बनवायचे.

advertisement

पनीर बनवण्याची कृती..

- सर्वत आधी एक ताजा दुधी भोपळा घ्या, तो सोलून त्याचे लहान तुकडे करा.

- दुसऱ्या बाजूला रात्रभर भिजवलेले शेंगदाणे घ्या आणि त्याची साल काढून घ्या.

- आता भोपळ्याची साल काढून त्याचे तुकडे करा.

- भिजवलेले शेंगदाणे आणि भोपळ्याचे थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

- यानंतर हे मिश्रण एका गाळणीतून गाळून घ्या. यामुळे यातील तंतू निघतील.

advertisement

- आता तुम्हाला पांढरे द्रव मिळेल. यामध्ये आणखी थोडे पाणी घालून दुधासारखे पातळ करून घ्या.

- यानंतर हे मिश्रण जाड तळाच्या पॅनमध्ये घाला. मिश्रण पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या आणि मध्ये मध्ये ढवळत राहा.

- मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये गॅस कमी करा. आता यामध्ये एक चमचा व्हिनेगर घाला आणि ते हळूहळू मिक्स करा.

advertisement

- थोड्या वेळाने तुम्हाला ते फाटलेल्या दुधासारखे दिसू लागेल.

- पाणी आणि घट्ट भाग वेगळे होऊ लागले की गॅस बंद करा.

- आता एका सुती कापडावर हे मिश्रण टाकून गाळून घ्या. यामुळे पाणी निथळेल आणि पनीर कापडात राहील.

- आता कापड गुंडाळा आणि हे त्यावर एक वजनदार भांडे ठेवून त्याचे पाणी निथळू द्या.

- सुमारे अर्ध्या तासानंतर सर्व पाणी निथळेल आणि तुमचे घट्टसर पनीर तयार होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
No Milk Paneer Recipe : तुम्ही कधी भोपळ्याचं पनीर खाल्लंय? प्रोटीन रिच, व्हीगन डाएटसाठी बेस्ट! पाहा सोपी प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल