युरिक ॲसिड हे प्युरिनपासून बनते. प्रोटीन शरीरात तुटतात तेव्हा त्याचे उपउत्पादन म्हणून प्युरिन तयार होते. प्युरीनमुळे युरिक ॲसिड तयार होते. युरिक ॲसिड सांध्यामध्ये जमा होऊन तेथील कार्टिलेज खराब होऊ लागते. येथे आम्ही तुम्हाला औषधी गुणधर्म असलेल्या काही सामान्यतः उपलब्ध पानांबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या चघळण्याने शरीरातील यूरिक ॲसिड कमी होऊ शकते आणि त्यामुळे गुडघेदुखी कमी होते.
advertisement
हिरवे वाटाने कसे स्टोर करावे? 2 सोप्या टिप्सने अनेक महिने राहतील फ्रेश
या पानांनी युरिक ऍसिड कमी करा
1. मेथीची पाने- TOI च्या बातमीनुसार, मेथीमध्ये यूरिक ऍसिड कमी करण्याची क्षमता असते. मेथीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करतात. इंफ्लामेशन झाल्यामुळे गुडघ्यांना सूज येते. त्यामुळे मेथीची पाने चघळल्यास किंवा पाण्यात मेथी भिजवून प्यायल्यास युरिक ॲसिड कमी होते.
2. कोथिंबिरीची पाने- कोथिंबिरीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात आणि त्यात अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म देखील असतात. हे सर्व मिळून रक्तातील यूरिक ॲसिड कमी करते, ज्यामुळे गुडघेदुखीपासून खूप आराम मिळतो.
3. गुळवेल पाने- गुळवेलला गुरुच असेही म्हणतात. काही ठिकाणी त्याला अमरबेल असेही म्हणतात. अमरबेलमध्ये अनेक औषधी गुणधर्म असले तरी गुडघेदुखीवर हा रामबाण उपाय आहे. गुळवेल पानांमध्ये इम्युनोमोड्युलेटरी आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अमरबेलच्या पानांपासून ते मुळापर्यंत सर्व काही उपयुक्त आहे. गुळवेलची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. एकूण आरोग्यासाठी हे एक उत्कृष्ट औषध आहे.
4. पुनर्नावाची पाने – पुनर्नावाची पाने थोडी जाड असतात. त्यात फुलेही येतात. किडनी आणि लिव्हर साफ करण्यासाठी पुनर्नवा खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, पुनर्नवाची पाने कुस्करून सांध्यांवर लावल्यास गुडघेदुखीपासून आराम मिळतो.
5. विड्याची पानं- विड्याची चघळल्याने युरिक ॲसिड नियंत्रित राहते असाही आयुर्वेदात दावा करण्यात आला आहे. विड्याच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात जे सूज शोषून घेतात. सकाळी फक्त विड्याची पानं चावून खाल्ल्यास दिवसभर युरिक ॲसिड नियंत्रणात राहते. यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो.
