सध्या महाराष्ट्रात कडक उन्हाळा सुरू आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. हिवाळ्यात लपून बसलेल्या पाली आता भिंतीवर रेंगाळू लागल्या आहेत. पुढील काही दिवसात या पालींचं प्रमाण वाढत जाईल. या पाली स्वयंपाकघरात शिरण्याचा आणि अन्न दुषित करण्याचा धोका असतो. कारण त्या अनेकदा अन्नाच्या भांड्यांमध्ये, उघड्या अन्नात आणि इतर वस्तूंमध्ये शिरून अन्न दूषित करतात.
advertisement
पालींमुळं विविध प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका असतो. पालींमुळं प्रामुख्यानं साल्मोनेला नावाचा आजार पसरतो. यामुळं त्यांनी दुषित केलेल्या अन्नातून विषबाधा, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. तसेच पाल चावल्यासदेखील संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळं त्यांना घराबाहेर हाकलणं अतिशय गरजेचं असतं.
पाली घालवण्याचे बेस्ट उपाय
डॉक्टरांनी यावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आग्रा येथील डॉक्टर आशिष मित्तल यांनी सांगितलं की, पालींमुळं साल्मोनेला नावाचा आजार पसरू शकतो. हे टाळण्यासाठी स्वयंपाकघरातील भांडी आणि अन्न नेहमी व्यवस्थित पॅक करून ठेवा. तसेच पालींमुळं होणारा साल्मोनेला संसर्ग टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे उपाय देखील डॉ. आशिष मित्तल यांनी सांगितले आहेत.
पालींमुळं पसरणारा संसर्ग टाळम्यासाठी तुमचं घर कायम स्वच्छ ठेवा, पालींना अन्न आणि पेयांपासून दूर ठेवा. रात्री झोपताना किचन व्यवस्थीत स्वच्छ करून ठेवा. तसेच पालीची विष्ठा आणि मूत्राच्या संपर्कात आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. तसेच त्यांची विष्ठा जिथे पडली असेल ती जागा जंतुनाशकानं स्वच्छ करा. याशिवाय घरात पाली जिथून प्रवेश करतात. त्या सर्व जागा बंद ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
डॉक्टर आशिष मित्तल यांनी सांगितलं की, पालीमुळं होणारा संसर्ग साल्मोनेलावर वेळेवर उपचार करणं आवश्यक आहे. कारण साल्मोनेला हा एक गंभीर जिवाणू संसर्ग असून तो आतड्यांवर परिणाम करतो. साल्मोनेलामुळं अतिसार, ताप, पोटदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर त्वरित उपचार करणे गरजेचं असतं.
डॉ. आशिष मित्तल यांनी पुढे स्पष्ट केलं की, काही रुग्णाची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास हा आजार जीवघेणा देखील ठरू शकतो. कोणीही आपल्या आरोग्याबाबत कधीही निष्काळजी राहू नये. कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, यावर देखील डॉ. मित्तल यांनी जोर दिला.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
