तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांपासून तुम्ही एक छान नाईट क्रीम बनवून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. विशेष म्हणजे या नाईट क्रीम्स तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परिनाम होत नाही आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने उजळवण्यास देखील ती मदत करते.
अनेक जण आपल्या घरी कुंडीमध्ये गुलाबाचे रोप लावतात आणि त्यावर अगदी सुंदर अशी फुले उमलतात. तुम्ही गुलाबाच्या फुलांच्या या सुंदर पाकळ्या आणि तांदूळ वापरून घरीच एक उत्तम नाईट क्रीम तयार करू शकता. तुमच्या घरी गुलाब नसेल तर मार्केटमध्ये तो सहज उपलब्ध होतो. या गुलाबाच्या मदतीने तुम्ही बाजारातील महागड्या उत्पादनांपेक्षा जास्त परिणामकारक नाईट क्रीम तयार करू शकता आणि तुमच्या त्वचेला एक नवसंजीवनी देऊ शकता.
advertisement
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तांदूळ आणि गुलाबाचं मिश्रण चमत्कारिकरित्या काम करते. जपानी आणि कोरियन स्किनकेअरमध्ये त्वचा उजळवण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तांदळाचा आगदी प्रभावी पद्धतीने वापर केला जातो. तसेच गुलाब हा त्वचेला थंडावा देणाऱ्या आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. या दोन्ही वस्तू एकत्र करून बनवलेली क्रीम रात्रभर त्वचेला खोलवर पोषण देते. यामुळे सकाळी तुमचा चेहरा तेजस्वी दिसतो.
ही क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला पाव कप तांदूळ आणि ताज्या गुलाबाच्या पाकळ्या लागतील. सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि कमीतकमी 4-5 तास स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. दुसरीकडे गुलाबाच्या पाकळ्या थोड्या गुलाबजलमध्ये भिजवून घ्या जेणेकरून त्यातील अर्क पूर्णपणे निघेल. आता भिजवलेला तांदूळ थोड्या पाण्यात मिसळून बारीक वाटून घ्या. तांदुळ वाटून घेतल्यानंतर ते सुती कापडातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्या. हे पाणी जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असते. हे पाणी त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खूप प्रभावी असते.
यानंतर गुलाबाच्या पाकळ्या देखील वाटून घ्या आणि त्यांचं पाणी गाळून घ्या. यातून मिळालेला गुलाबाचा अर्क तांदळाच्या दुधात पूर्णपणे मिसळा. हे मिश्रण केवळ अद्भुत सुगंध निर्माण करतं आणि त्वचेची नैसर्गिक पीएच पातळी संतुलित ठेवण्यासही मदत करतं. तयार केलेलं हे मिश्रण एका पातेल्यात ओता व्यवस्थीत ढवळत अगदी मंद आचेवर गरम करा. काही मिनिटांतच ते घट्ट होईल आणि त्याला मलईसारखा पोत येईल. ते जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ते कडक होऊ शकतं. मलईसारखे दिसू लागल्यानंतर लगेच गॅस बंद करा.
तायर झालेलं मिश्रण थोडं थंड होऊ द्या. यानंतर त्यात एक चमचा कोरफडीचा गर आणि दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील घाला. कोरफड त्वचेला आर्द्रता देते आणि व्हिटॅमिन ई नैसर्गिक सुक्षा प्रदान करते. दोन्ही पदार्थ क्रीम लवकर खराब होण्यापासून वाचवतात. आता तुमचं क्रीम पूर्णपणे तायर आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवा आणि हे क्रीम 10 मिनिटे चेहऱ्यावर लावून मालिश करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
