प्रत्येक नावाचं, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं वैशिष्ट्य असतं. व्यक्तीच्या नावाचं जे आद्याक्षर आहे, त्यावरून त्या व्यक्तीचं स्वभाववैशिष्ट्य लक्षात येऊ शकतं. त्यानुसार इंग्रजी बी लेटरपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती कशा असतात, हे जाणून घेऊ.
रात्री जास्त का रडतात न्यूबॉर्न बेबी? काय आहे कारण?
बी अक्षरावरून ज्यांचं नाव सुरू होतं, त्या व्यक्ती मनाने खूप कणखर असतात. कोणाच्याही समोर त्या पटकन वाकत नाहीत. या व्यक्तींचा स्वभाव खूप संवेदनशील असतो. दुसऱ्यांकडे त्या खूप लक्ष देतात, त्यांची काळजी घेतात. बी अक्षरावरून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव उत्साही, सहकार्य करणारा, स्वावलंबी, उदार आणि समृद्ध असतो. या व्यक्ती ध्येय गाठण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात, प्रसंगी संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी असते. इतरांना मदत करण्याचीही त्यांची तयारी असते. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती खूप पुढचा विचार करणाऱ्या असतात. पुढे कसं जायचं याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे त्या स्वतःला कणखर समजतात. दुसऱ्यांकडून आपलं काम कसं करून घ्यायचं किंवा दुसऱ्यांसाठीही काम करावं लागतं, हेही त्यांना माहीत असतं. बी अक्षरावरून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावातली काही प्रमुख वैशिष्ट्य खालीलप्रमाणे असतात.
advertisement
सहकार्यभाव : या व्यक्ती आपलं कुटुंब, मित्रपरिवार यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. दुसऱ्यांची मदत करण्यात त्यांना आनंद मिळतो. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी प्रसंगी त्या स्वतःचं काम बाजूला ठेवतात. जोपर्यंत त्यांचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत या व्यक्ती शांत बसत नाहीत.
उत्साही : या व्यक्ती त्यांचं लक्ष्य गाठण्यासाठी उत्साही असतात. सतत नवं काम करण्याची त्यांच्याकडे प्रेरणा आणि ऊर्जा असते. त्यामुळेच त्या यशस्वी होतात.
स्वावलंबी : बी अक्षराच्या व्यक्ती स्वावलंबी आणि स्वतंत्र विचारांच्या असतात. आपली कामं आणि आपल्या समस्या स्वतः सोडवण्याची त्यांची इच्छा असते.
उदार : आपल्या मनातल्या भावना इतरांना सांगायला या व्यक्तींना आवडतं. इतरांप्रती त्या उदार असतात. दुसऱ्यांसाठी वेळ, पैसे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने मदत करण्यात त्यांना धन्यता वाटते.
समृद्ध : या व्यक्ती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असतात. स्वतःचं ध्येय गाठण्यात त्यांना यश मिळतं. जीवनात विविध क्षेत्रांमध्ये त्या समृद्ध असतात.
बी अक्षरावरून नाव सुरू होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही सगळी स्वभाववैशिष्ट्यं असतीलच असं नाही, मात्र ढोबळमानानं त्यांच्या स्वभावात या काही गोष्टी दिसून येतात.
