TRENDING:

Paneer Dangers : तुम्हीही पनीर आवडीनं खाताय? सावध व्हा! 'या' लोकांसाठी ठरू शकतं आजारांचं कारण!

Last Updated:

लग्नसमारंभ, सण आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पनीरचा समावेश असतोच. पण तुम्हाला माहितीये का की, पनीर खाणं प्रत्येकासाठी सुरक्षित नसतं, काही लोकांसाठी ते हानिकारक देखील ठरू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पनीरची भाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पनीरची भाजी चवीला तर बेस्ट असतेच शिवाय ते प्रोटीन आणि कॅल्शियम उत्तम स्त्रोत असल्याने त्यातून भरपूर प्रमाणात पोषण देखील मिळते. यामुळं हाडं आणि स्नायूं मजबूत होण्यास मदत होते. शाकाहारी खवय्यांचा तर हा अतिशय आवडता पदार्थ आहे. त्यामुळे बहुसंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरेंटमध्ये पनीरच्या भाजीचे अनेक प्रकार उपलब्ध असतात आणि त्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते.
पनीर कोणी खाणं टाळावं?
पनीर कोणी खाणं टाळावं?
advertisement

अनेक जण घरीच पनीरची उत्तम भाजी आणि विविध पदार्थ बनवतात. लग्नसमारंभ, सण आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये पनीरच्या पदार्थांचा समावेश हा असतोच. पण तुम्हाला हे माहिती आहे का की पनीर खाणं प्रत्येकासाठी सुरक्षित नसतं, काही लोकांसाठी ते हानिकार देखील ठरू शकतं. जास्त फॅट्स असलेल्या पनीरमुळं हृदयविकार, कोलेस्ट्रॉल आणि पोटाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. तसेच ज्यांना पनीरची ॲलर्जी आहे, त्यांच्यावर याची गंभीर रिअ‍ॅक्शन होऊ शकतो. त्यामुळं पनीर खाताना कोणी अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं पनीर खाऊ शकता हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.

advertisement

पनीर खाणं कोणासाठी सुरक्षित?

पनीर प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय ते अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असते. त्यामुळे ते खाणं सामान्य आरोग्य असलेल्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. हे पनीर हाड मजबूत ठेवण्यासाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी फायदेशीर मानलं जातं. लहान मुलांच्या वाढीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते उपयुक्त असंत.

याशिवाय गर्भवती महिला देखील पनीर फ्रेश असेल तर ते अतिशय सुरक्षितपण खाऊ शकतात. कारण त्यातून मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व शरीराला मिळतात. यामुळे गर्भातील बाळाचा विकास चांगाल होण्यास मदत होते. परंतु गर्भवती महिलांनी फ्रेश आणि चांगलं पनीरच खाणं योग्य ठरेल. तुम्हाला देखील पनीर खायला आवडत असेल तर ती चांगली सवय आहे. कारण योग्य प्रमाणात पनीर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, हाडं आणि दातांचं आरोग्य सुधारतं. तसेच स्नायू विकसित आणि मजबूत होण्यास मदत होते. परंतु पनीर खाणं हे प्रत्येकासाठी फायदेशीर नसंत. काही लोकांवर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो.

advertisement

पनीर कोणी खाणं टाळावं?

पनीर हे आरोग्याच्या दृष्टी अतिसय फायदेशीर मानले जात असेल तरी काही लोकांनी ते खाणं टाळावं. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल समस्या आहे त्यांच्यासाठी पनीरचं अतिसेवन हानिकारक ठरू शकतं. तसेच ज्यांना गॅस, आम्लपित्त किंवा अपचनासारख्या पोटाशी संबंधीत समस्या आहेत. त्यांनी देखील पनीर खाणं टाळावं. कारण ते पचण्यास थोडं जड मानलं जातं. याशिवाय ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे, त्यांनीही पनीरपासून दूर राहणं योग्य ठरेल. कारण पनीर खाल्यास त्याची गंभीर रिअ‍ॅक्शन होऊ शकते. पनीर खाल्ल्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

advertisement

हे लक्षात ठेवा

पनीरचं सेवन आरोग्यासाठी चांगलं असलं तरी ते प्रमाणात हवं. दिवसाला 50 ते 100 ग्रॅम पनीर पुरेसं असतं. योग्य प्रकारचं आणि ताजं पनीर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. परंतु शक्यतो रात्रीच्या वेळी पनीर खाणं टाळा. कारण डिनरमध्ये पनीर खाल्ल्यास आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. तसेच पनीर खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होत किंवा पोटाच्या समस्या जाणवत असेल तर ते खाणं टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Paneer Dangers : तुम्हीही पनीर आवडीनं खाताय? सावध व्हा! 'या' लोकांसाठी ठरू शकतं आजारांचं कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल