चला ती कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे हे जाणून घेऊ.
सामग्री: अर्धा कप पोहा आणि रवा, आर्धा कप दही, अर्धा कप पानी, अर्धा टीस्पून मीठ, तेल आवश्यकतेनुसार
टॉपिंगसाठी : अर्धा कांदा, शिमला मिर्ची आणि गाजर, 5 फरसबी, 2 टेबलस्पून कोथिंबीर, चिली फ्लेक्स इत्यादी
कृती:
5 मिनिटांसाठी पोहे पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून पोहे मिक्सरला वाटून पेस्ट तयार करा. त्यात रवा, दही, पाणी आणि मीठ टाका आणि थोडा वेळ रेस्टसाठी ते बॅटर बाजूला ठेवा. तोपर्यंत टॉपिंगसाठीचे सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा आणि ते बाजूला ठेवा.
advertisement
पोह्याच्या बॅटरपासून छोटे उत्तपम तव्यावर घालून त्यावर टॉपिंग पसरा. थोडं तेल सोडून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
नाश्त्यासाठी दररोज काहीतरी वेगळं आणि झटपट तयार होणारं हवं असेल, तर ‘पोहा उत्तपम’ ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. अगदी थोडक्यात साहित्य आणि कमी वेळात तयार होणारा हा पोहा उत्तपम हलकासा असूनही भरपूर पोषणमूल्य देणारा आहे. चवीनं आणि पोषणमूल्यांनी भरलेला हा पोहा उत्तपम नाश्त्यासाठी एक भन्नाट पर्याय ठरू शकतो.