लाल भोपळ्याचे फायदे..
- लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. लाल भोपळ्यामधे कॅलरीज कमी असतात. म्हणून लाला भोपळा खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि आपण जास्त खाणं टाळू शकतो.
- तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, तर लाल भोपळा तुमच्या आहारात असायला हवा. कारण त्यात फायबर आणि पाणी असते, जे पचनसंस्था सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतडे स्वच्छ राहतात. लाल भोपळा पचायला हलका असल्यामुळे पोटाला त्रास होत नाही.
advertisement
- लाल भोपळा आपली दृष्टीच सुधारतो आणि मोतीबिंदूसारख्या समस्या टाळण्यासही मदत करतो. कारण लाल भोपळ्यामधे त्यात बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते.
- लाल भोपळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवतात. भोपळा नियमित खय्याने अनेक छोट्या छोट्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
- भोपळा फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपली त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. लाल भोपळ्यामधे असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे त्वचा चमकदार राहाते. भोपळा खाल्ल्याने कमी वयातच सुरकुत्या येत नाही आणि केसांनाही पोषण देतो, यामुळे केस मजबूत राहतात.
- लाल भोपळा हृदयासाठीही चांगला असतो. कारण त्यात पोटॅशियम आणि फायबर असतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. लाला भोपळा निहायमित खाल तर हृदयरोगाचा धोका कमी होईल.
लाल भोपळ्याच्या बियाही आहेत फायदेशीर
लाल भोपळ्याप्रमाणे त्याच्या बिया आणि पानंही फायदेशीर असतात. होपल्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे हाडे आणि शरीर मजबूत करतात.
लाला भोपळ्याची पानं पोषक तत्वांनी समृद्ध असतात. लाला भोपळ्याची पानं आणि फुलं व्हेज डंपलिंगमध्ये वापरले जाऊ शकतात. तसेच ते अनेक चटण्या बनवण्यासाठी वापरता येतात. फायदे अनेक असले तरी कोणत्याही पदार्थाचे प्रमाण आपल्या आहारात योग्य असावं. खूप जास्त नाही किंवा खूप कमी नाही. शिवाय कोणत्याही पदार्थामुळे त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
