TRENDING:

रताळे आणले का? उपवासासाठी बनवा झटपट रताळ्याची खीर; रेसिपी Video

Last Updated:

Sweet Potato Kheer Recipe: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. यामध्ये काही गोड पदार्थ सुद्धा असतात पण जर तुम्हाला छान वेगळं आणि झटपट होणार काय करायचं असेल तर तुम्ही रताळ्याची खीर करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎ उपवासासाठी करा ही  रताळ्याची खीर
advertisement

छत्रपती संभाजीनगर: महाशिवरात्र म्हटले की आपल्यापैकी अनेकांना उपवास असतो. उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करतो. त्यामध्ये काही गोड पदार्थ देखील असतात पण जर तुम्हाला छान वेगळं आणि झटपट होणार काय करायचं असेल तर तुम्ही रताळ्याची खीर करू शकता. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनून ही खीर तयार होते. ह्याची रेसिपी सांगितली आहे ऋतुजा पाटील यांनी.

advertisement

रताळ्याच्या खीर साठी लागणारे साहित्य

1 मोठ्या आकाराची रताळ, पाऊण वाटी साखर, साजूक तूप, केशर ड्रायफ्रूट आणि दूध आणि वेलची पूड एवढे साहित्य याकरता लागणार आहे.

सर्वप्रथम आपण जे घेतलेलं रताळ आहे त्याला कुकरमधून तीन ते चार शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर त्याचा किस करून घ्यायचा. एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि आपण जे घेतले ड्रायफ्रूट आहेत तर त्यामध्ये टाकून रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. ड्रायफूट भाजले की त्यामध्ये रताळ्याचा किस टाकायचा आणि तो देखील परतून घ्यायचा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर चुकूनही अशा वस्तू टाकू नका, संपूर्ण माहिती, Vid
सर्व पहा

त्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचं आणि त्याला सतत हलवत राहायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण जी घेतलेली साखर आहे ती टाकायची साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. याला सतत हलवत राहायचं. त्यानंतर केसर टाकून घ्यायचं आणि थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची.5 मिनिट ह्याची उकळी काढून घ्यायची. अशा सोप्या पद्धतीने तुमची ही रेसिपी बनवून तयार होते. घरी एकदा नक्की ट्राय करा

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
रताळे आणले का? उपवासासाठी बनवा झटपट रताळ्याची खीर; रेसिपी Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल