TRENDING:

Sea Moss benefits: विविध आजारांवर गुणकारी आहे समुद्री शेवाळ, एकदा खाल्ल्याने दूर होतील आजार

Last Updated:

Health Benefits of Sea Moss in Marathi: समुद्री शेवाळ किंवा ‘सी-मॉस’मध्ये फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स, फोलेट, कॅल्शियम, आयोडीन, जस्त, पोटॅशियम, खनिजं आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वं असतात. ज्यामुळे ‘सी-मॉस’ खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पावसाळ्यात पाणी साचून जमीनीवर येणारं शेवाळ आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ जिथे जिथे पाणी साचून राहतं तिथे तिथे शेवाळं उगवू शकतात. मग पृथ्वीवरचा पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत असलेल्या समुद्रामध्ये शेवाळ कसं नाही उगवणार. भलेही जमीनीवर उगवणारं शेवाळ हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं जरी नसलं तरीही समुद्रात उगवणारं, समुद्री शेवाळ म्हणजेच ‘सी-मॉस’ हे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायद्याचे ठरू शकतात.
प्रतिकात्मक फोटो : विविध आजारांवर गुणकारी आहे समुद्री शेवाळ, एकदा खाल्ल्याने दूर होतील आजार
प्रतिकात्मक फोटो : विविध आजारांवर गुणकारी आहे समुद्री शेवाळ, एकदा खाल्ल्याने दूर होतील आजार
advertisement

पृथ्वीवर 70 टक्के पाण्याचे साठे आहे. त्यामुळे समुद्रात भल्या मोठ्या प्रमाणात हे समुद्री शेवाळ उपलब्ध होत आहे. शेवाळांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे त्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र फक्त समुद्र असलेल्या भागात किंवा किनारपट्टी भागात समुद्री शेवाळं किंवा ‘सी-मॉस’ हे उपलब्ध असेल असा समज मनातून काढून टाका. वाढत्या जागतीकरणामुळे आता ही सर्वत्र उपलब्ध आहेत. इतकच काय तर विविध ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही त्यांची थेट ऑर्डरही करू शकता.

advertisement

‘सी-मॉस’ चे फायदे जाणून घेण्याआधी जाणून घेऊयात त्यात असलेल्या पोषकतत्त्वांबद्दल.

‘सी-मॉस’ मध्ये असलेली पोषकतत्वं:

‘सी-मॉस’मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे पचनाच्या विकारांवर ‘सी-मॉस’ गुणकारी आहेत. यामुळे पोट आणि आतडे आतून स्वच्छ व्हायला मदत होते. याशिवाय ‘सी-मॉस’मध्ये फोलेट, कॅल्शियम, आयोडीन, जस्त, पोटॅशियम आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे ‘सी-मॉस’ हे एक सुपरफूड ठरतं.

advertisement

जाणून घेऊयात ‘सी-मॉस’ किंवा समुद्री शेवाळ खाण्याचे फायदे.

1)  हृदयासाठी गुणकारी :-

‘सी-मॉस’ मध्ये असलेले फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. फायबरमुळे खराब कोलेस्ट्रॉलचं म्हणजे LDL चं प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL चं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयाचं आरोग्य सुधारतं. याशिवाय अँटीऑक्सिडंट्समुळे मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण होतं.

advertisement

हे सुद्धा वाचा : Coconut Milk Benefits: वजन कमी करायचं आहे? मग प्या ‘हे’ दूध, गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापेक्षा होतील जास्त फायदे

2) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:-

‘सी-मॉस’मध्ये असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पोट हे दीर्घकाळ भरलेलं राहतं. त्यामुळे भूक न लागल्याने अतिरिक्त कॅलरीज पोटात जात नाही. त्यामुळे फॅट्स आणि कॅलरीज बर्न होऊन वजन कमी व्हायला मदत होते.

advertisement

3) थायरॉइडचा त्रास कमी होतो :-

‘सी-मॉस’मध्ये चांगल्या प्रमाणात आयोडिन आढळून येतं. थायरॉईडच्या संतुलित कार्यासाठी आयोडिन ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या शरीरात आयोडीनची कमतरता असेल तर तुम्हाला हायपोथायरॉईडचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ‘सी-मॉस’ किंवा समुद्री शेवाळ खाऊन तुम्ही आयोडिनची कमतरता भरून काढू शकता.

4)  पचनक्रिया सुधारते: -

समुद्रातील शेवाळात असलेल्या फायबर्समुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवते. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. याशिवाय ‘सी-मॉस’च्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे छातीत जळजळ, गॅसेस, पोटफुगी, बद्धकोष्ठता दूर होते. अतिसाराच्या समस्यांवरही ‘सी-मॉस’ गुणकारी आहे.

हे सुद्धा वाचा : Foods to avoid with fish: मासे खाताना टाळा ‘या’ चुका, अन्यथा आनंदावर पडेल ‘आजारपणाचं’ विरजण

5) पुरुषांसाठी फायदेशीर:-

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

‘सी-मॉस’मध्ये मोठ्या प्रमाणात झिंक आढळून येतं. त्यामुळे रक्तशुद्धीकरणासोबतच रक्तवाढीला मदत होते. समुद्री शेवाळ खाल्ल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं. याशिवाय टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या वाढीसाठीही ‘सी-मॉस’ फायद्याचं ठरतं. त्यामुळे ‘सी-मॉस’ खाल्ल्याने पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sea Moss benefits: विविध आजारांवर गुणकारी आहे समुद्री शेवाळ, एकदा खाल्ल्याने दूर होतील आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल