हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. हे आइस क्यूब चेहऱ्यावरील सूज, काळी वर्तुळं, मुरुम आणि उन्हामुळं भाजलेल्या त्वचेपासून त्वरित आराम देतात. काकडीचे क्यूब तुमच्या त्वचेला आतून आर्द्रता देतात. यामुळं त्वचा ताजी आणि चमकदार दिसू लागते. उन्हाळ्यात चेहरा थंड आणि ताजातवणा ठेवण्यासाठी काकडीच्या आईस क्यूब्सचा वापर अतिशय फायदेशीर ठरू शकतो. हा एक अतिशय सोपा उपाय आहे.
advertisement
असे बनवा काकडीचे आईस क्यूब..
यासाठी सर्वप्रथम एक ताजी काकडी धुवा, तिचे लहान तुकडे करा, मिक्सरमध्ये बारीक करा आणि तिचा रस काढा. या मिश्रणात थोडं गुलाबजल घाला आणि ते आईस ट्रेमध्ये ठेवा. यानंतर ते फ्रीझरमध्ये ठेवून गोठवा. तयार झालेले आईस क्यूब रोज चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर हळुवारपणे फिरवा. यामुळं तुमच्या त्वचेला त्वरित गारवा मिळेल आणि ती ताजेतवाणी दिसू लागेल.
त्वचा ताजीतवानी आणि चमकदार बनते
तुमचा चेहरा निस्तेज आणि फिकट दिसत असेल तर काकडीचे आईस क्यूब्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात . त्यातील पोषक ततवे त्वचेला आतून आर्द्रता देतात आणि तिची नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत करतात. या क्यूब्सचा दररोज वापर केल्यास तुमच्या चेहऱ्याची चमक परत येईल. हा एक सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय आहे. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हे क्यूब्स तुमची त्वचा ताजीतवानी आणि चमकदार बनवतो.
मुरुम आणि डाग कमी होतात
काकडीचे क्यूब्स चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी करण्यास अतिशय परिणामकार आहेत. यात असलेले दाहशामक गुणधर्म त्वचेची जळजळ शांत करतात आणि मुरुम कमी करतात. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग फिके पडतातत आणि त्वचा अधिक नितळ आणि स्वच्छ दिसू लागते. तुमची त्वचा तेलकट असेल तर हे तुकडे आणखी फायदेशीर ठरू शकतात.
उन्हातून घरी येताच चेहऱ्यावर लावा
उन्हाळ्यात तुम्ही कडक उन्हात घराबाहेर पडलात तर तुमची त्वचा भाजू शकते. यामुळं त्वचा लाल होऊ शकते आणि टॅन देखील होऊ शकते. त्यामुळं उन्हातून घरी परतल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून काकडीचे आईस क्यूब तुम्ही चेहऱ्यावरून फिरवले, तर तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. उन्हामुळे भाजलेल्या त्वचेपासून यामुळे त्वरित आराम मिळतो आणि तुमची त्वचा लवकर सामान्य होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील सूज कमी होते
डोळ्यांखाली काकडीचे बर्फाचे तुकडे लावल्याने सूज कमी होऊ शकते. तुमचे डोळे थकलेले किंवा सुजलेले दिसत असतील, तर हा उपाय खूप प्रभावी आहे. डोळ्यांभोवतीचे ब्लॅक सर्कल आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील हळूहळू कमी होतात. दररोज काही मिनिटांसाठी डोळ्यांभोवती लावल्याने चेहरा अधिक ताजा आणि तरुण दिसू शकतो. काकडीचे क्यूब चेहऱ्याररून फिरवल्याने त्वचेची छिद्रे लहान होतात आणि पोत सुधारतो. यामुळं चेहरा अधिक मऊ दिसू लागतो.
त्वचेला नवचैतन्य मिळू शकते
काकडीचे बर्फाचे तुकडे संवेदनशील त्वचेसाठी देखील सुरक्षित मानले जातात. त्यामध्ये कोणतेही रसायन नसल्याने ते त्वचेला हानी पोहोचवत नाहीत. रोज काकडीचे बर्फाचे तुकडे वापरल्याने चेहरा ताजा आणि तरुण दिसतो. ते त्वचेला आर्द्रता देतात आणि थकवा कमी करतात. सकाळी किंवा रात्री ते लावल्याने त्वचेला नवचैतन्य मिळू शकते. हा एक सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही जास्त खर्च न करता तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. परंतु कोणतीही अॅलर्जीची रिअॅक्शन टाळण्यासाठी वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट नक्की करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
