ताक आपले पचन सुधारते आणि पोटातील चांगले जिवाणू वाढवते. आज आम्ही तुम्हाला ताकाच्या एका खास मसाल्याची रेसिपी सांगत आहोत. जो तुमच्या ताकाला अप्रतिम चव देतील. ही रेसिपी swast_ani_mast_recipes या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया हा स्पेशल ताक मसाला कसा बनवायचा.
ताक मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- पुदिन्याची पानं
advertisement
- 3 चमचे जिरे
- 2 चमचे धने
- 1 चमचा ओवा
- 8 ते 10 काळी मिरी
- 1 चमचा काळं मीठ
- पाव चमचा हिंग
- पाव चमचा सुंठ पावडर
ताक मसाला बनवण्याची कृती..
- सर्वात आधी ताजी पुदिन्याची पानं घ्या आणि ती एका पॅनमध्ये टाकून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
- पुदिना काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये जिरे, धने, ओवा, काळी मिरी टाकून तेही व्यवस्थित भाजून घ्या.
- हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या, त्यामध्ये काळं मीठ, हिंग आणि सुंठ पावडर टाका.
- या मिश्रणात भाजलेला पुदिना टाकून याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
- अशाप्रकारे तुमचा ताक मसाला तयार आहे. आता हा एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही महिनाभर साठवू शकता.
- जेव्हा तुम्हाला ताक बनवायचे असेल तेव्हा. तेव्हा अधिताक घ्या. किंवा दह्यामध्ये ओपन घालून ते घुसळून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ आणि साखर घाला. तसेच थोडी हिरवी मिरची आणि आलं ठेचून घ्या. तेही ताकामध्ये टाका.
- या सर्वांनंतर आपण तयार केलेला मसाला टाका आणि ताक पुन्हा चांगले घुसळून घ्या.
- आता हे ताक तुम्ही असेच पिऊ शकता किंवा हवे असल्यास त्यामध्ये बर्फदेखील घालू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
