TRENDING:

घरात साप असेल, तर मारू नका; तर 'हा' आदिवासी उपाय ट्राय करा, सापही अन् घरही राहील सुरक्षित!   

Last Updated:

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील आदिवासी पारंपरिक पद्धतीने सापांना हुसकावतात. महुआच्या सालांचा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा धूर केल्यास साप अस्वस्थ होतात व घराबाहेर पडतात. ही पद्धत पूर्णतः सुरक्षित असून...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
How to Remove Snakes Naturally : उन्हाळा असो वा हिवाळा, ग्रामीण भागात शेती आणि घरांच्या आसपास सापांचा धोका नेहमीच असतो. विशेषतः उन्हाळ्यात साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात आणि नुकसान करू शकतात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील बहुतेक लोक सापांना मारून टाकतात. पण, गोड्डा येथील आदिवासी समुदायांनी सापांना हुसकावून लावण्यासाठी शेकडो वर्षांपासूनची पारंपरिक पद्धत अवलंबली आहे.
How to Remove Snakes Naturally
How to Remove Snakes Naturally
advertisement

ही पद्धत केवळ सुरक्षितच नाही, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील महागामा येथील डकैता गावातील लोक मोह्याच्या पाल्याचा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा धूर करून सापांना हुसकावून लावतात. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की या धुरामुळे सापांना त्रास होतो आणि ते स्वतःहून घराबाहेर पडतात. यामुळे त्यांना मारावे लागत नाही. पर्यावरणही सुरक्षित राहते आणि पापही लागत नाही.

advertisement

नैसर्गिक पद्धत

डकैता गावातील सोमाल हांसदा यांनी लोकल 18 ला सांगितले की, “आमच्या पूर्वजांकडून आम्ही शिकलो आहोत की जर साप घरात घुसला किंवा जवळपास दिसला, तर मोह्याच्या पाल्याला आग पेटावा आणि घराच्या एका कोपऱ्यात धूर करा. यामुळे साप दुसऱ्या कोपऱ्यातून बाहेर जाईल. ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आणि नैसर्गिक आहे.”

सापांना हुसकावून लावण्याचा स्वस्त उपाय

advertisement

यामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही, ज्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत नाही आणि सापांनाही इजा होत नाही. मोह्याची पेंड जवळच्या दुकानात सहज आणि कमी किमतीत, फक्त 50 रुपयांना उपलब्ध होते. हा आमच्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे, जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे.

सापही राहतील सुरक्षित

साप परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते शेतीसाठी हानिकारक कीटकांवर नियंत्रण ठेवतात. अशा परिस्थितीत ही पद्धत केवळ गावकऱ्यांना सुरक्षित ठेवते, तर सापांना न मारता त्यांना हुसकावून लावण्याचा एक अनोखा मार्ग देखील प्रदान करते.

advertisement

हे ही वाचा : बारावीनंतर लगेच जाॅब हवाय? 'हे' 3 शॉर्ट टर्म कोर्सेस कराल तर, महिना 30000 कमवाल!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

हे ही वाचा : उन्हाळ्यात भूक कमी लागते? मग रोज करा 'हे' खास उपाय, वाढेल भूक आणि सुधारेल पचनक्रिया

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
घरात साप असेल, तर मारू नका; तर 'हा' आदिवासी उपाय ट्राय करा, सापही अन् घरही राहील सुरक्षित!   
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल