TRENDING:

Health Tips : कूलर वापरताना ही काळजी नक्की घ्या, अन्यथा मलेरिया आणि चिकनगुनियाचा वाढेल धोका!

Last Updated:

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोक डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजाराने मरण पावतात, यावरून डास किती घातक आहेत याचा अंदाज लावता येऊ शकतो. दरवर्षी 20 कोटींहून अधिक जणांना मलेरिया होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डास हा लहानसा कीटक किती उपद्रवी आहे, याची आपल्यापैकी प्रत्येकाला कल्पना असेल. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात दरवर्षी सहा लाखांहून अधिक लोक डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजाराने मरण पावतात, यावरून डास किती घातक आहेत याचा अंदाज लावता येऊ शकतो. दरवर्षी 20 कोटींहून अधिक जणांना मलेरिया होतो. ॲनोफिलीस नावाची मादी डास या आजाराला जबाबदार असते.
News18
News18
advertisement

तुंबलेल्या किंवा दीर्घकाळ एखाद्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात या मादीचा जन्म होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी वापरले जाणारे कूलरसुद्धा या मादी डासाच्या वाढीसाठी अनुकूल ठरतात. अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती झाली की, घरात रोगराई पसरण्यासाठी जास्त काळ लागत नाही.

उन्हाळ्यात बहुतांश घरांमध्ये कूलरचा वापर केला जातो. थंड हवा आणि पाण्याच्या शिडकाव्याने कूलर लोकांना उष्णतेपासून आराम देतो. पण, कूलरमधील पाणी किती काळानंतर बदललं पाहिजे, हे अनेकांना माहीत नसते. कूलरमध्ये जास्त वेळ पाणी राहिल्यास त्यात मलेरिया पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते, याची देखील अनेकांना कल्पना नाही. जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कूलर वापरला जात असेल तर तुम्ही तो ठराविक काळानंतर स्वच्छ केला पाहिजे.

advertisement

स्वयंपाक करताना घामाने हाल होतात? 'या' टिप्स वापरा, उन्हाळ्यातही किचन राहील थंड

आपण कूलरमध्ये नेहमी स्वच्छ पाणी भरतो. पण, जसजसा त्याचा वापर होतो तसतसं हे पाणी खराब होतं आणि त्यात मलेरिया व चिकनगुनिया पसरवणाऱ्या डासांची पैदास सुरू होते. या डासांमुळे घरातील सर्व सदस्यांना मलेरिया आणि चिकनगुनियासारखे आजार होऊ शकतात. जर तुम्ही कूलरमधील पाणी वापरत असाल तर कूलर आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केलं पाहिजे. तसेच गरज भासल्यास कूलरच्या टाकीत वेळोवेळी थोडं रॉकेलही टाकावं, असं केल्याने डासांची उत्पत्ती होत नाही.

advertisement

कूलरच्या टाकीतील पाणी बदलल्याने मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या रोगांना प्रतिबंध होईलच असं नाही. त्यामुळे कूलरमधील पाणी बदलण्यासोबतच कूलरचे पॅडही स्वच्छ करावेत. याशिवाय वेळोवेळी हे पॅड बाजूला काढून सूर्यप्रकाशात सुकवणे गरजेचं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जगभरातील 85 देशांमध्ये मलेरियाची 249 दशलक्ष प्रकरणं नोंदवली गेली. यापैकी सहा लाख आठ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत आफ्रिकन प्रदेशात मलेरियाची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

advertisement

तान्ह्या बाळांना AC मध्ये झोपवणं सुरक्षित आहे का? या 6 गोष्टी पालकांना माहित हव्याच!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : कूलर वापरताना ही काळजी नक्की घ्या, अन्यथा मलेरिया आणि चिकनगुनियाचा वाढेल धोका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल