TRENDING:

दादरमधील 'फ्युजन हट' Momos Lovers साठी पर्वणी, 20 हून अधिक प्रकारचे युनिक मोमोज

Last Updated:

मोमोजमध्ये यांच्याकडे खूप प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये व्हेज मोमोजमध्ये व्हेज स्टीम मोमोज, व्हेज फ्राइड मोमोज, व्हेज कुरकुरे मोमोज आणि व्हेज तंदूर मोमोज मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील- प्रतिनिधी
advertisement

मुंबई :  सध्या अनेक जण व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. दादरमधील एका जोडीने सुद्धा कमाल करून दाखवली आहे. हे दोघेही दादरमध्येच वास्तव्यास आहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. फ्युजन हट मधून ते मोमोजचे २० हून अधिक फ्युजन प्रकार विकतात. सोबतच फास्टफूडमधले सगळे प्रकार त्यांच्याकडे मिळतात. त्यांच्या इथे मिळणारे टेस्टी बाईट अफलातून लागतात असं दादरकरांचं म्हणणं आहे.

advertisement

मोमोजमध्ये यांच्याकडे खूप प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये व्हेज मोमोजमध्ये व्हेज स्टीम मोमोज, व्हेज फ्राइड मोमोज, व्हेज कुरकुरे मोमोज आणि व्हेज तंदूर मोमोज मिळतात. यांची किंमत फक्त ५० रुपयांपासून इथे सुरू होते. त्यासोबत नॉनव्हेज मोमोजमध्ये सुद्धा स्टीम, फ्राईड, कुरकुरे आणि तंदूर मोमोज उपलब्ध आहेत. त्यांची किंमत इथे फक्त ७० रुपयांपासून सुरू होते. फ्युजन हटमध्ये मिळणारा सगळ्यात स्पेशल मेनू म्हणजे चिकन अफगाणि मोमो, व्हेज अफगाणि मोमो आणि पनीर अफगाणि मोमो. यांच्यावर टाकली जाणारी क्रीम आणि क्रिमी मोमोज खाण्यात एक वेगळीच मजा आहे. यांची चव तर उत्तम आहे पण त्यासोबतच दादरकरांची ही डिश अगदी फेवरेट आहे.

advertisement

मोमोज व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर फास्टफूड व्हायचं असेल तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहे. यामध्ये चिकन गार्लिक फिंगर, फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, चिकन चीज बॉल हे सगळं मिळतं.

नवीन आणि निलांबरी या दोघांनी मिळून २०२३ साली हा व्यवसाय सुरू केला. पूर्वी त्यांचा हा फ्युजन हटचा व्यवसाय स्ट्रीटवर होता परंतु त्यांनी त्यांचा व्यवसाय आता एका दुकानात सुरू केला आहे. या व्यवसायातून महिन्याची कमाई एक ते दीड लाख रुपये होते. यामागे या दोघांचीही प्रचंड मेहनत आहे.

advertisement

"आम्ही दोघेही खवय्ये आहोत आणि त्यामुळे आम्हाला स्वतःलाच वेगवेगळ्या खाण्याच्या गोष्टी ट्राय करायला आवडतात. याचाच उपयोग आम्हाला या व्यवसायात सुद्धा झाला. लोकांना काहीतरी वेगळं आणि युनिक देता यावं याचकरिता आम्ही हा व्यवसाय सुरू केला" असे नवीन यांनी सांगितले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 1000 रुपयांमध्ये रेल्वे स्थानकावर सुरू करा व्यवसाय,असा घ्या खास योजनेचा लाभ
सर्व पहा

दादर स्थानकापासून फक्त पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या कोवळीवाडी इथे जाखादेवी मंदिराच्या जवळ आणि जाखादेवी बस स्टॉपच्या अगदी समोरच 'फ्युजन हट' नावाचे हे दुकान आहे. साधे मोमोज तर आपण नेहमीच खातो परंतु फ्युजन मोमोज तुम्हालाही ट्राय करायचे असतील तर आवर्जून दादरमधील या दुकानाला भेट द्या.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दादरमधील 'फ्युजन हट' Momos Lovers साठी पर्वणी, 20 हून अधिक प्रकारचे युनिक मोमोज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल