हिरव्या पालेभाज्या
पालक आणि मेथीसारख्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असते. हे घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
गाजर आणि बीट
गाजर आणि बीट यांमध्ये विरघळणारे फायबर असते, जे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल शोषून घेतात आणि बाहेर काढतात. त्यांचा रस पिणे किंवा सॅलडमध्ये त्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
advertisement
भेंडी आणि वांगी
भेंडी आणि वांगी यांमध्ये एक विशेष प्रकारचे जेलसारखे फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल आतड्यांमध्ये शोषले जाण्यापासून रोखते. या भाज्या नियमित खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.
लसूण आणि आले
लसूण आणि आले हे दोन्ही केवळ चवीसाठी नाहीत, तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही प्रभावी आहेत. लसूणमधील ॲलिसिन नावाचा घटक कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
कारले
कडू असले तरी कारले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचेही गुणधर्म आहेत, जे हृदयविकाराचा धोका कमी करतात.
आहारात समावेश करण्याची पद्धत
या भाज्या कच्च्या, वाफवून किंवा कमी तेलात बनवून खा. जास्त प्रमाणात तेल किंवा मसाले वापरल्यास त्यांचे फायदे कमी होऊ शकतात. या भाज्यांना तुमच्या रोजच्या आहारात सामील करून तुम्ही नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवू शकता. पण लक्षात ठेवा, हे उपाय वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुमच्या आहारात बदल करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)