TRENDING:

Summer Drink : 'हे' निळं कुलिंग ड्रिंक तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवेल फ्रेश! दिसायला आणि चवीला आहे एक नंबर

Last Updated:

आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ड्रिंक सांगत आहोत. जे तुम्ही सहज घरी बनवू शकता. हे ड्रिंक दिसायला तर खास आहेच, पण याचे फायदेही अनेक आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात आपण अनेक प्रकारचे कोल्ड ड्रिंक पितो. पण बाहेरचे कोल्ड ड्रिंकही आपल्याला टाळायचे असतात. अशावेळी घरीच सुंदर मोजितोसारखं दिसणारं एखादं कोल्ड ड्रिंक आपल्याला घरीच बनवता आलं तर.. आज आम्ही तुम्हाला असच एक भन्नाट ड्रिंक सांगत आहोत. जे तुम्ही सहज घरी बनवू शकता. हे ड्रिंक दिसायला तर खास आहेच, पण याचे फायदेही अनेक आहेत.
असं बनवा अपराजिताचं समर कुलर ड्रिंक..
असं बनवा अपराजिताचं समर कुलर ड्रिंक..
advertisement

हे कोल्ड ड्रिंक बनवलं जातं अपराजिताच्या फुलांपासून. अपराजिता आपल्या आरोग्यासाठी खूप अफायदेशीर आहे. अपराजिता स्मरणशक्ती वाढवते, अनेक आजारांवर उपचार म्हणून ही फुलं वापरली जातात. आयुर्वेदात पित्त, वात आणि कफ या तिन्ही दोषांवर औषध म्हणून याचा वापर केला जातो. याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.

अपराजिताच्या फुलांचे फायदे..

- एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, अपराजिताची फुलं उच्च रक्तदाब लवकर कमी करतात. तसेच हृदयाशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करते. यामध्ये असलेल्या इथॅनॉइक ॲसिडमुळे शरीरातील फॅटी ॲसिड कमी होतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, हार्ट ब्लॉक आणि धमन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

advertisement

- संशोधनातून हे सिद्ध झालंय की, या फुलांचा उपयोग मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड संयुगे असतात, जे केंद्रीय मज्जासंस्थेला उत्तेजित करतात. यामुळे मेंदूची आकलनशक्ती वाढण्यास मदत होते, मानसिक थकवा दूर होईल.

- त्वचेच्या संसर्गाशी लढण्यासाठी अपराजिता एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेतील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. त्यामुळे गजकर्ण, खरुज, खाज, एक्झिमा, सनबर्न आणि सोरायसिस यांसारख्या आजारांमध्ये अपराजिताचे सेवन फायदेशीर ठरते.

advertisement

अपराजिता अल्सर, अपस्मार आणि मधुमेह यांसारख्या इतर आजारांच्या उपचारातही उपयुक्त आहे.

असं बनवा अपराजिताचं समर कुलर ड्रिंक..

- सर्वात आधी अपराजिताची फुलं घ्या. तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती घ्या. नाहीतर वाळलेली फुलंही चालतील.

- एका कपमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ही अपराजिताची फुलं टाकून ठेवा.

- काही वेळानंतर या फ़ुलान्चा रंग आणि अर्क पाण्यामध्ये पूर्णपणे उतरेल.

advertisement

- तेव्हा फुल पाण्यातून काढून टाका.

- आता मोठ्या काचेच्या ग्लासमध्ये थोडा लिंबाचा रस टाका.

- त्यानंतर लिंबाचे दोन गोल कापलेले तुकडे टाका.

- यानंतर काही पुदिन्याची पानं आणि थोडंसं मीठ टाका.

- त्यानंतर हे ग्लासमध्येच थोडंसं क्रश करून घ्या, म्हणजेच हलकं दाबून घ्या.

- आता यामध्ये बर्फाचे तुकडे आणि सोडा वॉटर घाला.

advertisement

- शेवटी आपण तयार केलेलं अपराजिताच्या फुलांचं मिश्रण टाका.

सर्वकाही स्ट्रॉ किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून हे ड्रिंक सर्व्ह करा. याला अगदी सुंदर रेंग येईल आणि हे ड्रिंक तुम्हाला खूप रिफ्रेश देखील करेल. शिवाय अपराजिताच्या फुलांचे फायदेही तुम्हाला मिळतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Drink : 'हे' निळं कुलिंग ड्रिंक तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवेल फ्रेश! दिसायला आणि चवीला आहे एक नंबर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल