'Benefits of Vitamin B12 मांस, मच्छी सोडा; ‘या’ भाज्यांमधून सहज मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी12'
आहारतज्ज्ञांच्या मते रोजच्या हिरव्या चटणीचा वापर आहारात केल्यामुळे शरीरातून युरिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. ही चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, लसूण, आले, लिंबांचा वापर केला जाऊ शकतो. लिंबातलं व्हिटॅमिन सी, आलं आणि पुदिन्यातले अँटिऑक्सिडंट्स शरीरातले विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकायला मदत करतात. हिरव्या चटणीमुळे लघवीचे होण्याचं प्रमाण वाढून लघवीद्वारे यूरिक ऍसिड काढून टाकण्यास मदत होते. यामुळे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर पडतीलच मात्र त्याचबरोबर किडनीचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल.
advertisement
'Mood Boosting Foods: मूड नाहीये; मग ट्राय करा ‘हे’ पदार्थ, लगेच वाटेल फ्रेश, दूर होईल नैराश्य'
लसूण आणि आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे यूरिक ऍसिडमुळे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. या चटणीमध्ये वापरण्यात आलेले मसाले पचनक्रिया मजबूत करतात आणि यामुळे पोटही साफ होते. त्यामुळे या चटणीचा वापर आहारात करणे गरजेचे आहे.
या व्यतिरिक्त तुम्ही आल्याचा चहा आणि काकडी पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर पिऊ शकता ज्यामुळे युरिक ॲसिडचा त्रास कमी व्हायला मदत होईल.