घरातून कॉकरोच पळवण्याचे उपाय
घरातून कॉकरोचचा सफाया करायचा असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे कॉकरोज पळवणारे केमिकल्स वापरुन पाहिले असतील. पण तरीही कॉकरोच पाठ सोडत नसतील. तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहेत. केमिकल्स युक्त प्रोडक्ट्सने तुम्हाला नुकसानही होऊ शकते. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी एक खूप सोपा उपाय सांगितला आहे. हा तुम्ही अवश्य ट्राय करुन पाहायला हवा.
advertisement
Fungal infection: पावसाच्या पाण्यामुळे बुरशीचा संसर्ग, या टीप्स वापरुन घ्या त्वचेची काळजी!
कॉकरोज किचनमध्ये झाले तर हे अनहायजिनिक असतात. सोबतच रोगही पसरवतात. अशा वेळी काही सोपे उपाय तुम्ही करुन पाहणं खूप गरजेचं आहे.
1. कॉकरोज पळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बोरिक पावडर. हे तेच पावडर आहे, जे आपण कॅरमबोर्ड खेळताना बोर्डवर वापरत असतो. तुम्हाला बोरिक पावडर आणि साखर समान प्रमाणात म्हणजेच 1-1 चमचा घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्यायची आहे. आता ती ज्या ठिकाणी कॉकरोज दिसतात त्या ठिकाणी टाका. ही बोरिक पावडर खाताच कॉकरोचचा खेळ खल्लास होईल. हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करुन बघा.
Health Tips: चिकन, अंडी विसरा; फक्त भाजीमध्ये मिसळा ही गोष्ट, मिळेल भरभरुन प्रोटीन!
2. कॉकरोज पळवण्याचा दुसरा सर्वात प्रभावशाली उपाय म्हणजे बेकिंग सोडा हा आहे. यामध्ये समान प्रमाणात साखर मिसळा. तुम्ही 1-1 चमचा हे दोन्ही बाउलमध्ये टाकून मिक्स करुन शकता. घरातील कोपऱ्यांमध्ये हे मिश्रण टाका. हे खाताच कॉकरोज असे पळतील की पुन्हा तुमच्या घरात येणार नाहीत.
