अशावेळी हे घरगुती क्लीन्झर तुम्ही वापरू शकता. घरगुती फेस क्लीन्झर पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्वचेला हळुवारपणे स्वच्छ करून तिला आतून निरोगी बनवते. उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे चेहऱ्यावर टॅनिंग होतं, त्वचा निस्तेज आणि काळी दिसते. या समस्यांवर हे घरगुती क्लीन्झर खूप उपयुक्त ठरू शकते.
या क्लीन्झरमधले नैसर्गिक घटक त्वचेला गारवा देतात आणि हळूहळू टॅनिंग कमी करतात. यामुळे हळूहळू तुमची त्वचा पुन्हा फ्रेश आणि चमकदार होऊ लागते. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही आणि ते त्वचेला खोलवर पोषण देतात. हे फेस क्लीन्झर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत किंवा खर्च लागत नाही. फक्त दही, मध आणि कॉफी लागते. हे सर्व साहित्य आपल्या किचनमध्ये असतंच.
advertisement
हे फेस क्लीन्झर त्वचा स्वच्छच करून तिला मऊ आणि ग्लोइंग बनवतात. चेहऱ्यावर दीर्घकाळ नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी हे बेस्ट आहे. या मिश्रणातील दही त्वचेला आराम देते, मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि कॉफी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून रंग सुधारण्यास मदत करते. हे क्लीन्झर बनवण्यासाठी एका स्वच्छ वाटीत एक चमचा कॉफी पावडर घ्या, नंतर त्यात एक चमचा ताजे दही आणि थोडे मध घाला घालून घट्ट आणि मऊ पेस्ट बनवा.
तयार केलेतर क्लीन्झर चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवे असतील तर आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा याचा वापर करा. हे क्लीन्झर त्वचा खोलवर स्वच्छ करते, घाण आणि मळ काढून टाकते, त्याचसोबत त्वचेचा काळपटपणाही हळूहळू कमी होतो.
तुम्ही हे क्लीन्झर पहिल्यांदा वापरत असाल, तर चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. याने तुम्हाला कळेल की, हे क्लीन्झर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक असलं तरी, प्रत्येकाच्या त्वचेची प्रतिक्रिया वेगळी असते. म्हणूनच हे वापरताना जळजळ किंवा ऍलर्जी जाणवल्यास ते त्वरित धुवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
