TRENDING:

Functional Freeze : उत्साहात दिवस सुरु करता, पण काहीवेळाने मेंदू पॉज होतो? फंक्शनल फ्रीझमधून असं पडा बाहेर..

Last Updated:

What Is Functional Freeze : आपण ठरवतो आजच्या दिवसात ही ही कामं करायचीच. मात्र जसजसा दिवस पुढे सरकतो आपला उत्साह मावळू लागतो. एका क्षणी मेंदू अचानक संपावर जातो आणि बंद पडतो. त्यापुढे आपल्याला काय करायचंय, काय करायला हवंय हेही कळेनासं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बऱ्याचदा असं होतं की, आपण कामांची उत्तम यादी बनवलेली असते किंवा रोज सकाळी आपण ठरवतो आजच्या दिवसात ही ही कामं करायचीच. मात्र जसजसा दिवस पुढे सरकतो आपला उत्साह मावळू लागतो. एका क्षणी मेंदू अचानक संपावर जातो आणि बंद पडतो. त्यापुढे आपल्याला काहीच सुचत नाही आणि काय करायचंय, काय करायला हवंय हेही कळेनासं होतं.
फंक्शनल फ्रीझ म्हणजे काय?
फंक्शनल फ्रीझ म्हणजे काय?
advertisement

ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या लोकांची कामं बहुतांशवेळा ठरलेली असतात. म्हणून त्यांना अशी फार अडचण येत नाही. मात्र जी लोकं घरून काम करतात त्यांना याचा निभाव जास्त येऊ शकतो. विशेषतः अशा महिला किंवा पुरुष जे घर आणि मुलं सांभाळतात. त्यांना घरकामाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी करायच्या असतात. पण कितीही ठरवलं तरी कालांतराने त्यांना या अप्रिय स्थितीचा सामना करावा लागतो. याला फंक्शनल फ्रिज असं म्हणतात. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

advertisement

फंक्शनल फ्रीझ म्हणजे काय?

बऱ्याच लोकांना वाटू शकते हा निव्वळ आळस आहे. मात्र असे नाही. ही अशी स्थिती आहे जिथे शरीर, मेंदू आणि भावना सर्व काही स्थिरावतात. व्यक्तीची काम करण्याची क्षमता असते, परंतु या अवस्थेत कमला सुरुवात करण्याची ऊर्जा किंवा इच्छा नसते. अशावेळी लहान आणि साधी कामे देखील अवघड वाटतात. आपण अचानक पॉज मोडमध्ये जातो. दीर्घकालीन ताण, बर्नआउट किंवा जीवनात दिशा नसणे ही या स्थितीची कारणं असू शकतात.

advertisement

फंक्शनल फ्रीझची लक्षणं

फंक्शनल फ्रीज ही परिस्थिती तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर खूप परिणाम करू शकते. या स्थितीत व्यक्ती भावनिकदृष्ट्या तटस्थ होते, हृदयात वेदना असूनही डोळ्यातून अश्रू येत नाही, लोकांपासून अलिप्त राहणं आवडायला लागतं. सोशल मीडियाचा वापर खूप वाढणे, दारू किंवा ड्रग्जच्या आहारी जाणे, तासंतास टीव्ही किंवा मोबाईल पाहणे, झोपेच्या समस्या, पोटाच्या समस्या, शारीरिक वेदना ही लक्षणं जाणवतात.

advertisement

फंक्शनल फ्रीझमधून बाहेर कसं पडावं?

- फंक्शनल फ्रीजवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शारीरिक हालचाली सुरू करणे. पण अचानक जिम किंवा कठोर व्यायाम करू नका. हलका व्यायाम किंवा चालायला सुरवात करा.

- फंक्शनल फ्रीझ चा त्रास कमी करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम करा. हे करण्यासाठी, प्रथम 4 सेकंदांसाठी श्वास घ्या, नंतर 7 सेकंदांसाठी तुमचा श्वास रोखून ठेवा आणि नंतर 8 सेकंदांनी हळूहळू श्वास सोडा. ही क्रिया तुम्ही 4-5 वेळा करू शकता.

advertisement

- मेंदू पॉज मोडमध्ये गेल्यास जाणीवपूर्वक हसण्याचे व्यायाम करा. हसण्यामुळे एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स शरीरात वाढते. यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

- निसर्ग हा कोणत्याही प्रकारच्या ताणावर उत्तम उपाय आहे. म्हणून गार्डांमध्ये फिरणे किंवा बाहेर जाणे शक्य नसल्यास बाल्कनीत बसा. डोळ्यांना दिसणारी हिरवळ तुमचे मन हलके होण्यास आणि ताण कमी होण्यास मदत करू शकते.

फंक्शनल फ्रीझमधून बाहेर पडणे तसे सोपे आहे. मात्र बऱ्याचदा परिस्थिती आपल्या हाताबाहेरही जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा काहीही त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधी चांगले. मानसिक त्रासांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Functional Freeze : उत्साहात दिवस सुरु करता, पण काहीवेळाने मेंदू पॉज होतो? फंक्शनल फ्रीझमधून असं पडा बाहेर..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल