४ एप्रिलचे बाजारभाव
४ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-हिवरगाव बाजार समितीत ५२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर ५४०० रुपये तर कमाल दर ५६०० रुपये होता. सर्वसाधारण दर ५५०० रुपये नोंदवण्यात आला.
नागपूर बाजारात १७९ क्विंटल आवक झाली असून, येथे किमान दर ४८०० रुपये तर कमाल ५७०० रुपये मिळाला. सरासरी दर ५४७५ रुपये राहिला. पिंपळगाव (औरंगपूर भेंडाळी) येथे पिवळ्या सोयाबीनला थेट ५६०० रुपयांचा दर मिळाला.
advertisement
३ एप्रिलचे बाजारभाव
३ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, लातूर बाजार समितीत सर्वाधिक १९,४४० क्विंटल सोयाबीनची मोठी आवक झाली. येथे किमान दर ५४८० रुपये, कमाल दर ५६९१ रुपये आणि सरासरी दर ५५०० रुपये होता.
सोलापूर बाजारात ७० क्विंटल आवक झाली असून, येथे सर्वाधिक ५७०० रुपयांचा दर मिळाला, तर सरासरी दर ५६१५ रुपये राहिला. अकोला बाजारात ६४८ क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर ५५०० रुपये नोंदवण्यात आला.
काही बाजारांत दर घसरले
काही बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरणही पाहायला मिळाली. पैठण येथे केवळ १ क्विंटल सोयाबीनला ३२०० रुपयांचा दर मिळाला. वरोरा-शेगाव बाजारात किमान दर २४०० रुपये इतका खाली आला आणि सरासरी दर ४००० रुपये राहिला. येवला बाजारातही किमान दर ४५०१ रुपये नोंदवण्यात आला.
चांगले दर मिळालेले बाजार
बार्शी आणि पिंपळगाव (पालखेड) या बाजारांमध्ये तुलनेने चांगले दर मिळाले. बार्शीत ५६०० रुपयांचा स्थिर दर होता, तर पिंपळगाव (पालखेड) येथे हायब्रीड सोयाबीनला सरासरी ५५६० रुपये दर मिळाला.
