TRENDING:

रस्त्याने जाताना अडवलं, मित्राचे हातपाय बांधले, तरुणीवर 5 जणांचा अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे रोडवरील भानखेडा फाटा इथं एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे रोडवरील भानखेडा फाटा इथं एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. १९ वर्षीय पीडित तरुणी आपल्या एका मित्रासह भानखेडा फाटा परिसरातून जात होती. यावेळी तिथं आलेल्या पाच जणांनी दोघांना अडवलं. आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले. यानंतर नराधमांनी पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
अमरावतीत तरुणीवर सामूहिक अत्याचार
अमरावतीत तरुणीवर सामूहिक अत्याचार
advertisement

ही घटना २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री पाच आरोपींना अटक देखील केली होती. मात्र पोलिसांकडून आरोपींची नावं जाहीर केली जात नव्हती. यामुळे संतप्त नागरिक आणि विविध संघटनांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अखेर घटनेच्या आठ दिवसानंतर पोलिसांनी या पाचही आरोपींची नावं जाहीर केली आहेत.

advertisement

नेमकी घटना काय होती?

२८ मार्च रोजी रात्री ८ ते साडेनऊच्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी आणि तिचा मित्र रस्त्याने जात असताना पाच आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मित्राला दोरखंडाने बांधून त्याला अमानुष मारहाण केली. यानंतर आरोपींनी तरुणीवर पाशवी अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

advertisement

आरोपींची नावे आणि अटकेची कारवाई

पोलिसांनी घटनेच्या रात्रीच पाचही आरोपींना शिताफीने अटक केली होती. मात्र, तपासाच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे पोलीस आरोपींची नावे उघड करत नव्हते. यामुळे अमरावती शहरात तीव्र जनक्षोभ उसळला होता. जनआक्रोशानंतर अखेर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली आहेत. ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय ३४), दीपक मरसकोल्हे (वय २९), प्रमोद नारायण वाघाडे (वय ३९), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (वय २८) आणि

advertisement

उमेश बेनीराम भोयर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या पाचही आरोपींना शनिवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.

फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या अमानवीय कृत्यामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरून आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यावर फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी," अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रस्त्याने जाताना अडवलं, मित्राचे हातपाय बांधले, तरुणीवर 5 जणांचा अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल