TRENDING:

पाण्यात गुंगीचे औषध घालून 50 वर्षीय चुलत्याचे पुतणीवर अत्याचार; लग्नाच्या पंधरा दिवसातच समोर आलं धक्कादायक वास्तव; बीड हादरलं

Last Updated:

रक्ताच्या नात्याला आणि विश्वासाला तडा देणारी एक अत्यंत घृणास्पद घटना केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 50 वर्षीय नराधमाने आपल्या नात्यातील 19 वर्षीय पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रक्ताच्या नात्याला आणि विश्वासाला तडा देणारी एक अत्यंत घृणास्पद घटना केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
News18
News18
advertisement

50 वर्षीय चुलत्यावर आपल्या 19 वर्षीय चुलत पुतणीला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हे कृत्य कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही या नराधमाने दिली होती. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

पाच महिन्यांपूर्वी अत्याचार, लग्नानंतर झाला उलगडा

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार साधारण पाच महिन्यांपूर्वी घडला होता. आरोपीने पीडितेच्या पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला. यानंतर या कृत्याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडित तरुणी प्रचंड दहशतीखाली होती. या घटनेनंतर काही दिवसांतच पीडितेचा विवाह झाला आणि ती सासरी निघून गेली.

advertisement

कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली 

पंधरा-वीस दिवसांपूर्वीच विवाह झालेली ही तरुणी तीन दिवसांपूर्वी माहेरी आली होती. तिथे तिला झालेल्या त्रासाबद्दल तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन सर्व हकीगत सांगितली. आपल्याच नात्यातील व्यक्तीने केलेले हे नीच कृत्य ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यानंतर  त्यांनी  युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले.

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार

advertisement

पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात संबंधित 50 वर्षीय चुलत्याविरुद्ध अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला असून  पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत.

मुलगी पाहायला जाण्यास नकार, तरुणासह पती-पत्नीसोबत भयंकर घडलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video
सर्व पहा

मुलगी पाहायला जाण्यास नकार दिल्याने एका तरुणावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. लिंबागणेश येथे किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तिघांनी एका तरुणावर हल्ला केला. यामध्ये जखमी तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या पती-पत्नीलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. या कारणावरून तिघेही संतापले आणि त्यांनी कृष्णाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तसेच लोखंडी गजाने चेहऱ्यावर प्रहार केल्याने तो जखमी झाला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाण्यात गुंगीचे औषध घालून 50 वर्षीय चुलत्याचे पुतणीवर अत्याचार; लग्नाच्या पंधरा दिवसातच समोर आलं धक्कादायक वास्तव; बीड हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल