advertisement

भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video

Last Updated:

Inspiring Story: पिंपरी-चिंचवड येथील सविता आणि शशीराम आत्माराम अंध दाम्पत्य आपल्या मेहनतीवर आयुष्य जगत आहे.

+
भीक

भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video

पुणे: एखादं दिव्यांगत्व असलं की जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि कुणाच्या तरी आधाराने जगावं लागतं. परंतु, पिंपरी-चिंचवड येथील सविता आणि शशीराम आत्माराम अंध दाम्पत्य आपल्या मेहनतीवर आयुष्य जगत आहे. कोणावरही अवलंबून न राहता ते स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दोघेही हॅन्डमेड वस्तू तयार करतात आणि रस्त्यावर विकतात. त्यांची हीच संघर्ष कहाणी लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सविता आणि शशीराम हे सकाळपासून ते रात्रीपर्यंत या वस्तूंची विक्री करत असतात. पण एवढ्या मेहनतीनंतरही त्यांना दिवसभरात फक्त 200 ते 300 रुपये मिळतात. या कमी पैशांतही ते आनंदाने आपला संसार करत आहेत. अडचणी असूनही त्यांनी हार मानलेली नाही. त्यांची ही जिद्द आणि मेहनत इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
advertisement
घरीच बनवतात खास वस्तू
“अंध असणाऱ्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु आम्ही त्यातून मार्ग काढत स्वाभिमानाने जगत आहोत. प्रत्येक गोष्ट कोणावर अवलंबून न राहता स्वतः करतो, हॅन्डमेड वस्तू आम्ही स्वतःच घरी करतो. यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या जोरावर आम्ही या वस्तू बनवतो,” असं सविता सांगतात.
दिवसाला 200-300 रुपये मिळतात
शशीराम सांगतात की, “या वस्तू आम्ही रात्रभर बनवतो आणि दिवसा त्या विकायला जातो. दिवसभर विकून साधारणपणे 200 ते 300 रुपयेच मिळतात. परंतु या 200 ते 300 रुपयांवरच आम्ही स्वाभिमानाचे जीवन जगत आहोत. या दोन-तीनशे रुपयांवर आमचा रोजचा उदरनिर्वाह चालतो.”
advertisement
समाजाने आमच्यासारख्या लोकांकडून वस्तू विकत घ्यायला हव्यात. पण प्रत्यक्षात खूप कमी लोक आमच्याकडून वस्तू घेतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जेव्हा आम्ही भीक मागतो, तेव्हा लोक म्हणतात काम करून का खात नाही? आणि जेव्हा आम्ही मेहनत करून वस्तू तयार करून विकायला लागतो, तेव्हा आमच्याकडून वस्तू खरेदी केल्या जात नाहीत, अशी खंत सविता आणि शशीराम व्यक्त करतात.
advertisement
दरम्यान, स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दाम्पत्याची ही वेदना समाजाने समजून घेणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
भीक मागून नव्हे, आम्ही कष्टाचं खातो; अंध दाम्पत्याचा खास बिझनेस, कमाई नको जिद्द बघा, Video
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement