advertisement

एकत्र Dhurandhar 2 पाहायला गेले बापलेक; थिएटरमध्येच 'धुरंधर'स्टाईल राडा! घडलं काय?

Last Updated:

Dhurandhar 2 Theater Fight : धुरंधर 2 पाहण्यासाठी बापलेक एकत्र गेले, त्यांनी फिल्म तर पाहिली नाही पण त्यांनी तिथं धुरंधरसारखा राडा घातला आहे. असं नेमकं तिथं झालं तरी काय?

News18
News18
धुरंधर 2 फिल्म पाहण्याची उत्सुकता कित्येकांमध्ये आहे. काही लोकांनी कित्येक दिवस आधीच तिकीटं बुक केली आहेत. थिएटरमध्ये प्रेक्षकांची अक्षरश: गर्दी होते आहे. अशाच एका थिएटरमध्ये ही फिल्म पाहायला गेलेले बापलेक. पण तिथं असं काही घडलं की त्यांनी थिएटरमध्येच धुरंधर स्टाईल राडा घातला.
एका थिएटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात राडा झालेला पाहायला मिळतो आहे, माहितीनुसार एका वडिलांनी आपल्या मुलाला धुरंधर : द रिव्हेंज ही फिल्म दाखवण्यासाठी हा राडा घातला. बापलेक दोघं एकत्र फिल्म पाहायला गेले. पण तिथं त्यांना अडवण्यात आलं आणि मुलाच्या वडिलांनी असा गोंधळ घातला.
advertisement
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बापलेक एकत्र फिल्म पाहायला गेले तर त्यांना अडवण्याचं कारण काय? तर मुलाचं वय 18 वर्षांपेक्षा कमी, तो अल्पवयीन आणि धुरंधर फिल्म ए रेडेट म्हणजे फक्त प्रौढ व्यक्तींसाठीच आहे. अल्पवयीन किंवा लहान मुलांसाठी नाही. म्हणून ही फिल्म पाहण्यापासून मुलाला रोखण्यात आलं. त्यांना थिएटरच्या आत एंट्री दिली नाही.
advertisement
सीबीएफसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटच्या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ही फिल्म पाहता येणार नाही. त्यांच्या वयाचा पुरावा दाखवावा लागेल. पण वडिलांनी अल्पवयीन मुलाला धुरंधर 2 दाखवण्याचा हट्टच धरला. पण त्याला रोखलं म्हणून त्यांनी थिएटरमध्येच राडा घातला.
advertisement
ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. एमर्ल्ड मॉलमधील आयनॉक्स मेगाप्लेक्समधील हे दृश्य. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकत्र Dhurandhar 2 पाहायला गेले बापलेक; थिएटरमध्येच 'धुरंधर'स्टाईल राडा! घडलं काय?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement