TRENDING:

भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन अर्धनग्न तरुण शिरला, घटनास्थळाचा VIDEO समोर

Last Updated:

आमदार महेश बालदी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्याअगोदर या अनोळखी माणसाने आजूबाजूच्या सोसायटीमधे जाऊन कोयता घेऊन धमकवण्याचा प्रयत्न केला होता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सावंत, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

उरण: रायगड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उरण विधानसभेचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानात कोयता घेऊन एक अर्धनग्न माणून निवासस्थानात घुसल्याची घटना समोर आली आहे. पण, वेळीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला पकडलं. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला आहे. पण, या घटनेमुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, उरण विधानसभेचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानी रात्रीच्या सुमारास एक अनोळखी इसम घुसला असल्याची माहिती मिळाली. निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांनी लगेच धाव घेतली असता हा तरुण  कोयता घेऊन अर्धनग्न अवस्थेत होता.

हा तरुण दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. या तरुणाने कोयता हातात घेऊन परिसरात धिंगाणा घातला होता.  भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्याअगोदर या अनोळखी माणसाने आजूबाजूच्या सोसायटीमधे जाऊन कोयता घेऊन धमकवण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे.

advertisement

हा तरुण कोण होता, याची ओळख अद्याप पटली नाही. अर्धनग्न अवस्थेत कोयता घेऊन परिसरात धिंगाणा घालणाऱ्या या तरुणामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. आमदारांच्या बंगल्यात कोयता घेऊन घुसल्यामुळे व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

(सविस्तर बातमी लवकरच)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन अर्धनग्न तरुण शिरला, घटनास्थळाचा VIDEO समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल