TRENDING:

मालेगाव महापालिका कार्यालयात नागरिकांकडून नमाज पठण, व्हिडिओ आला समोर

Last Updated:

Malegaon Mahapalika News : लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह प्रभागातील काही मुस्लिम नागरिकांनी थेट मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण केल्याची घटना घडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मालेगाव : शहरातील एका घटनेने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभागातील बंद असलेले पथदीप सुरू करण्याची वारंवार मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची तक्रार करण्यासाठी आले असता लोक संघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्यासह प्रभागातील काही मुस्लिम नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण केल्याची घटना घडली.
Malegaon Mahapalika
Malegaon Mahapalika
advertisement

नमाजाची वेळ झाल्याने नागरिकांनी कार्यालयातच नमाज अदा केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पथदीप बंद, नागरिकांचा आरोप

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रभागात अनेक दिवसांपासून रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. यामुळे रात्री अपघात, चोरी व असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा वेगळा मार्ग अवलंबल्याचे सांगण्यात येते.

advertisement

व्हिडिओ व्हायरल, राजकीय प्रतिक्रिया

महानगरपालिका कार्यालयात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा विषय राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली. शासनाची वास्तू असलेल्या कार्यालयात अशा प्रकारे नमाज अदा करणे अयोग्य असल्याचा दावा करत, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

advertisement

मुख्यमंत्र्यांना पत्र

या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोमैया यांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात जाहीररित्या नमाज अदा करण्यात आल्याचा उल्लेख करत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले आहे. संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

advertisement

सोशल मीडियावर पोस्ट, आरोप-प्रत्यारोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अपघातात भाऊ गमावला अन् बदललं जगण्याचं मिशन, अभिनेत्याच्या भावाचं मोठं काम, Video
सर्व पहा

सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “आत्ता नाशिक महापालिका कार्यालयात नमाज” असे नमूद केले. काही महापालिका कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून वीज विभागाच्या कार्यालयात नमाज अदा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पोस्टनंतर प्रकरणाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून, समर्थक व विरोधकांकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मालेगाव महापालिका कार्यालयात नागरिकांकडून नमाज पठण, व्हिडिओ आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल