TRENDING:

आजचं हवामान: सावधान! 6 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार? हवामान विभागाने दिला महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:

राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे. बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अजून सगळीकडे पोहोचलेला नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे. यंदा सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मान्सूनचे वारे वेगाने पुढे सरकले आहेत. त्यामुळे मान्सून लवकर दाखल झाला. कोकणपट्ट्यात मागचे पाच दिवस मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर थोडी उसंत घेतली असून पुढचे चार दिवस मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे.
News18
News18
advertisement

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अति मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तर मच्छिमार व नागरिकांनी समुद्रावर जाऊ नये असं आवाहन केलं आहे. 30 मे पासून पावसाची तीव्रता कमी होईल.

advertisement

जालना, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज पावसाच्या हलक्या सरी बसरणार आहेत. मुसळधार पावसापासून थोडी उसंत मिळेल.

चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 40-50 किमी वेगाने वारे वाहणार असून शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे आदेश प्रशासन आहे हवामान विभागाने दिले आहेत. पुढचे 5-6 तास या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहे.

advertisement

जालन्यातील बदनापूर तालुक्यात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.यामुळे फळबागांचं नुकसान झालं आहे.तालुक्यातील अनेक गावांत विहीरी खचल्या आहेत.जमिनीवरील माती वाहून जाऊन जमिनी खरडल्या आहेत. त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यात जाऊन नुकसानीची  संयुक्त पाहणी केली. गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कोकण किनारपट्टी भागाला अक्षरशः झोडपून काढले मे महिन्यातच झालेल्या पावसाने अनेक नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकुळ घातलाय यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.. बीड मधील प्रसिद्ध असलेला कपिलधार धबधबा देखील ओसंडून वाहू लागला असून पर्यटकांची पावले आता या धबधब्याकडे वळताना दिसत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: सावधान! 6 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार? हवामान विभागाने दिला महत्त्वाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल