TRENDING:

उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा आकर्षक बॅग्स, किंमत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यातील हे ठिकाण माहितीये?

Last Updated:

ठाण्यातील एका होम बुटीकमध्ये किफायतशीर दरात विविध प्रकारच्या कापडी अ‍ॅस्थेटिक बॅग्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र व्हेकेशनचा मूड रंगात आला आहे. प्रवास, पिकनिक आणि सुट्ट्यांच्या नियोजनासोबतच आवश्यक वस्तू नीटनेटकेपणाने ठेवण्यासाठी आकर्षक आणि उपयुक्त बॅग्सची मागणी वाढू लागली आहे. अशातच ठाण्यातील घोडबंदर होम बुटीकमध्ये किफायतशीर दरात विविध प्रकारच्या कापडी अ‍ॅस्थेटिक बॅग्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.
advertisement

या बुटीकमध्ये मिळणाऱ्या कॉटन पाऊचची सुरुवात अवघ्या 50 रुपयांपासून होत आहे. लहान आकारातील कॉइन पाऊच 50 रुपयांत उपलब्ध असून सनग्लासेस ठेवण्यासाठी खास डिझाइन केलेले पाऊच 100 रुपयांत मिळतात. याशिवाय टॉयलेटरीज आणि मेकअप साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी विविध आकारांचे पाऊच 60 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. हे पाऊच केवळ उपयोगीच नाहीत तर त्यांची डिझाइनही आकर्षक आणि ट्रेंडी आहे.

advertisement

विशेष म्हणजे फेणी पॅक हे युनिसेक्स प्रॉडक्ट असून त्याची किंमत 200 रुपये आहे. तसेच ट्विन पाऊच 150 रुपयांत उपलब्ध आहे जे प्रवासासाठी अतिशय सोयीचे ठरते. एक दिवसाच्या पिकनिकसाठी वापरता येईल अशी सेग बॅग देखील येथे उपलब्ध आहे जी हलकी, स्टायलिश आणि उपयोगी आहे.

या सर्व बॅग्सची आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे वॉशेबल आहेत. त्यामुळे वारंवार वापर करूनही त्या स्वच्छ ठेवणे सोपे जाते. किफायतशीर दर, आकर्षक डिझाइन यांचा उत्तम मेळ साधल्यामुळे या बॅग्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

ग्राहकांना या बॅग्स ऑनलाइन मागवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 9975038932 या क्रमांकावर संपर्क साधून ऑर्डर देऊ शकतात. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या बॅग्स प्रवास अधिक सोयीस्कर आणि स्टायलिश बनवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा आकर्षक बॅग्स, किंमत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यातील हे ठिकाण माहितीये?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल