advertisement

Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी काय करायचं ? salt substitutes चा वापर सगळ्यांनी करावा का ?

Last Updated:

उच्च रक्तदाब असलेल्यांना डॉक्टर नेहमी मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका अभ्यासात महत्त्वाची बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी salt sabstitutes चा पर्याय दिला आहे. यासाठी डॉक्टरांनी सैंधव मीठ किंवा पोटॅशियम मीठ असे पर्याय दिले आहेत.

News18
News18
मुंबई : मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण घराघरात सापडतात. BP ला 'सायलेंट किलर' असंही म्हटलं जातं. उच्च रक्तदाबामुळे, शरीरातील अवयवांचं नकळतपणे नुकसान होतं आणि अनेकदा कोणतीही लक्षणीय लक्षणं दिसत नाहीत.
उच्च रक्तदाब असलेल्यांना डॉक्टर नेहमी मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका अभ्यासात महत्त्वाची बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी salt substitutes चा पर्याय दिला आहे. यासाठी डॉक्टरांनी सैंधव मीठ किंवा पोटॅशियम मीठ असे पर्याय दिले आहेत.
advertisement
सामान्य मिठात सोडियम क्लोराईड असतं. सोडियममुळेच शरीरात पाणी साठतं आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊन रक्तदाब वाढतो. याउलट, salt substitutes मधे, सोडियमचं प्रमाण कमी करून त्याऐवजी पोटॅशियम क्लोराईड वापरलं जातं. यामुळे शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल होतात आणि लघवीवाटे अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत होते.
रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी मिठाचे पर्याय हा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग आहे, तरीही लोक अजूनही त्याचा अवलंब करत नाहीत. अमेरिकेत केलेल्या या अभ्यासानुसार, सहा टक्क्यांपेक्षा कमी लोक त्यांचा वापर करतात. 2013 मधे हा आकडा सुमारे 5.4% होता, जो 2020 पर्यंत केवळ 2.5 % पर्यंत घसरला आहे.
advertisement
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उच्च रक्तदाब असलेले लोकसुद्धा याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे, त्यांच्यापैकी केवळ दहा टक्के लोक याचा वापर करतात. तर दुसरीकडे, ज्यांचा रक्तदाब अनियंत्रित आहे, त्यांच्यामधे हे प्रमाण आठ टक्क्यांपेक्षा कमी आहे. जे लोक आठवड्यातून तीन किंवा अधिक वेळा बाहेर रेस्टॉरंटमधे जेवतात, त्यांच्यासाठी salt substitutes चा उपयोग कमी होतो.
advertisement
मीठ वापरण्याच्या सवयी का बदलत नाहीत? याबद्दल संशोधकांनी यामागची काही मुख्य कारणं शोधून काढली आहेत:
माहितीचा अभाव - बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते. salt substitutes मुळे, रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते. डॉक्टरही नियमित तपासणीदरम्यान याची शिफारस करायला विसरु शकतात.
advertisement
चव - काही लोकांना पोटॅशियम मीठाची चव किंचित कडू वाटते.
कमी उपलब्धता: साधं मीठ छोट्या दुकानातही मिळतं, पण चांगल्या मीठाच्या पर्यायांसाठी अनेकदा मोठ्या सुपरमार्केटवर किंवा ऑनलाइन स्टोअर्सवर अवलंबून राहावं लागतं.
महत्त्वाची बाब म्हणजे, मीठ बदलण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण, salt substitutes फायदेशीर असले तरी, ते सर्वांसाठी योग्य नाहीत. तसंच किडनीचा आजार असेल, तर salt substitutes चा वापर टाळावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी काय करायचं ? salt substitutes चा वापर सगळ्यांनी करावा का ?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement