advertisement

उद्या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; एक चूक करेल मोठं नुकसान

Last Updated:
उद्या 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणतात. गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी अनेक भक्त या दिवशी कडक उपवास करतात. मात्र, संकष्टीचा उपवास करताना केवळ काय खावे हे महत्त्वाचे नसून, काय खाऊ नये याचेही काही कडक नियम शास्त्रात सांगितले आहेत.
1/7

2/7
जमिनीखाली उगवणारे पदार्थ: धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जमिनीखाली उगवलेले पदार्थ जसे की कांदा, लसूण, मुळा, गाजर आणि बीट खाणे वर्ज्य मानले जाते. विशेषतः कांदा आणि लसूण हे तामसी मानले जात असल्याने ते उपवासात खाल्ल्याने व्रताची सात्त्विकता भंग पावते.

3/7
काळे मीठ: उपवासात अनेकजण चवीसाठी मिठाचा वापर करतात. मात्र, संकष्टीला 'काळे मीठ' वापरणे टाळावे. त्याऐवजी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. समुद्री मीठ वापरणे देखील काही ठिकाणी टाळले जाते, त्यामुळे शक्यतो सैंधव मिठालाच प्राधान्य द्यावे.

4/7
धान्य आणि डाळी: संकष्टीचा उपवास हा 'फलाहार' किंवा 'नक्त' अशा स्वरूपाचा असतो. यामध्ये गहू, तांदूळ, मैदा किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळी खाऊ नयेत. चुकूनही भात किंवा चपातीचे सेवन केल्यास उपवास मोडला जातो, असे मानले जाते. त्याऐवजी साबुदाणा, वरीचे तांदूळ किंवा राजगिरा यांसारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

5/7
फणस आणि त्यापासून बनलेले पदार्थ: कोकण आणि काही भागांतील परंपरेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या उपवासात फणस खाणे वर्ज्य मानले जाते. फणसाचे गरे किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ उपवासाच्या ताटात असू नयेत, याची काळजी घ्यावी.

6/7
तामसी भोजन आणि मांसाहार: हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः उपवास करत नसाल, तरीही घरातील इतर सदस्यांनी या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नये. घरातील वातावरण शुद्ध आणि सात्त्विक असेल, तरच बाप्पाची कृपा प्राप्त होते. अशुद्ध अन्न किंवा उष्टे अन्न खाणे देखील या दिवशी टाळले पाहिजे.

7/7
तुळशीचा वापर टाळा: उपवासाच्या पदार्थात किंवा बाप्पाच्या नैवेद्यात विसरूनही तुळशीच्या पानाचा वापर करू नका. गणपतीच्या पूजेत तुळस वर्ज्य आहे. प्रसादासाठी किंवा जेवणात तुळस घातल्याने बाप्पा नाराज होतात, असे शास्त्र सांगते. त्याऐवजी भरपूर दुर्वा अर्पण करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement