advertisement

त्या पत्रामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची निवड रद्द होण्याच्या चर्चा, पण एका ओळीने गेम फिरला!

Last Updated:

सुनेत्रा पवार यांच्या पत्राचाच आधार घेऊन संबंधित पत्रामुळे खुद्द सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीच निवड रद्द होऊ शकते, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

पार्थ पवार-सुनेत्रा पवार
पार्थ पवार-सुनेत्रा पवार
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी १६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला एक पत्र दिल्याचे सांगितले जाते. या पत्राची प्रत अद्याप समोर येऊ शकलेली नाही. मात्र या पत्रातून पक्षातील सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे राहतील, असे प्रफुल पटेल यांनी सुचविल्याचे आरोप होत आहेत. याची कुणकुण सुनेत्रा पवार यांना लागल्यानंतर त्यांनी १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. यापूर्वी आयोगाकडे केलेला सगळा पत्रव्यवहार रद्दबातल समजावा, असे नमूद करून पटेल यांचा डाव उधळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पत्राचाच आधार घेऊन संबंधित पत्रामुळे खुद्द सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचीच निवड रद्द होऊ शकते, अशी कुजबुज सुरू झाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या पत्राचा अर्थ काय?

निवडणूक आयोगाला सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये पहिल्या पानावर निवडणूक आयोगाला २८ जानेवारी म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ते १० मार्च सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होईपर्यंत यादरम्यान कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. या मुद्द्यानुसार सुनेत्रा पवार यांची निवडच धोक्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. कारण याच काळात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात देखील पत्र व्यवहार झाला आहे. त्यामुळे तो ही रद्द होऊ शकतो, असे अनेक जण अर्थ काढत होते.
advertisement

बाजू कशी पलटली?

मात्र, निवडणूक आयोगाला २८ जानेवारी ते १० मार्च मधील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र देताना सुनेत्रा पवारांनी त्यात 'In this regard' असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन ( National Convention) संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असा अर्थ होतो. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन (National Convention) संदर्भातील पत्रव्यवहार वगळता बाकी सर्व पत्रव्यवहार ग्राह्य होतो.
advertisement

पार्थ पवार यांच्या संदर्भाने ते पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलंच नाही

त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे , निवडणूक आयोगासोबत नाही. त्यामुळे त्यातही कोणती अडचण नसल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगितले गेले आहे.
त्यामुळे कोणतेही पत्र परत घेण्याचा प्रश्नच नाही. दुसरा मुद्दा म्हणजे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहीने पाठवलेले पत्र रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. तसंच पत्रात संवैधानिकदृष्ट्या चुका असत्या तर सदर पत्र हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं असतं का? त्याचबरोबर पत्रात चुका असत्या तर तशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या असत्या, असे सुनेत्रा पवार यांच्या निवटवर्तीय नेत्याने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्या पत्रामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची निवड रद्द होण्याच्या चर्चा, पण एका ओळीने गेम फिरला!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement