'सुपर-डुपर'नंतर ललित प्रभाकरचा नवा धमाका, जुन्या हिरोईनसोबत OTT वर येतोय हा सिनेमा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ललित प्रभाकरचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय. दुसरीकडे थिएटरमध्ये त्याचा 'सुपर डुपर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
अभिनेता ललित प्रभाकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुपर डुपर हा त्याचा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा असलेल्या या सिनेमात ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत आहे. 3 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसादही मिळतोय. दरम्यान ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदीच बातमी आहे. ललितचा एक सिनेमा थिएटरमध्ये तर दुसरा ओटीटीवर रिलीज होतोय.
थिएटर आणि ओटीटी अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर ललितला पाहता येणार आहे. ललित प्रभाकर त्याच्या जुन्या अभिनेत्रीसोबत नव्या सिनेमात दिसणार आहे. जपान आणि भारतात चित्रित झालेला रोमँटिक चित्रपट 'तो, ती आणि फुजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग प्रामुख्यानं जपान आणि भारतात करण्यात आला आहे.
advertisement
इरावती कर्णिक यांनी हा सिनेमा लिहिला आहे तर मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केला आहे. ही कथा एका अत्यंत उत्कट नात्याबद्दल आहे. जे कालांतराने विषारी बनते, बदलत्या प्राधान्यांमुळे, परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांमुळे आणि अयोग्य भावनिक अपेक्षांमुळे तुटतं. वेगळे झाल्यानंतर सात वर्षांनी जुनं जोडपं अनपेक्षितपणे जपानमध्ये पुन्हा भेटतात. जुन्या जखमा आणि न सांगितलेल्या इच्छा पुन्हा उघडतात आणि काळानुसार बदललेले प्रेम कधीही परत येऊ शकते का असा प्रश्न उपस्थित करतात.
advertisement
सिनेमाविषयी बोलताना ललित प्रभाकर म्हणाला, "तो, ती आणि फुजी प्रेक्षकांना प्रेम, वेगळेपणा आणि एखाद्या व्यक्तीला पुन्हा भेटण्याचा अर्थ काय आहे याबद्दल सखोल वैयक्तिक दृष्टीकोन देते. त्यातून हे प्रेमी बदलतात, प्रेक्षकांनी जी नाती जगली किंवा सोडून दिली अशा नातेसंबंधांवर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करते."
advertisement
ललित सोबत त्याच्याबरोबर या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी गोडबोले प्रमुख भूमिकेत आहे. चि व चि सौ का या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ही जोडी तो ती आणि फुजीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमाविषयी बोलताना मृण्मयी म्हणाली, "जपानमधील चित्रीकरणाने या कथेला सखोल वैयक्तिक ठेवून जागतिक आयाम दिला आहे. ललितसोबत काम करायला परतल्यावर ते खास वाटले. त्यामुळे चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पुन्हा शोध घेण्याचा प्रवास' जणू आम्ही या निमित्ताने पुन्हा अनुभवला."
advertisement
'तो, ती आणि फुजी' हा सिनेमा येत्या 10 एप्रिलपासून सोनी लिव्हवर स्ट्रिम होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 6:19 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'सुपर-डुपर'नंतर ललित प्रभाकरचा नवा धमाका, जुन्या हिरोईनसोबत OTT वर येतोय हा सिनेमा







