advertisement

Mrunal Thakur : मराठमोळ्या मृणाल ठाकूरला 'अटक'! हातात बेड्या, पोलीस व्हॅनमधून बाहेर येतानाचा Video व्हायरल, भानगड काय?

Last Updated:

Mrunal Thakur Arrest Video : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुरला अटक केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या हातात बेड्या देखील पाहायला मिळत आहेत. नेमकी भानगड काय आहे?

News18
News18
मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर ही हिंदीबरोबर साऊथ इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतेय. मृणाल सध्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये मृणाल ठाकुर कैद्यांच्या व्हॅनमधून खाली उतरताना दिसतेय. तिच्या हातात बेड्या देखील दिसत आहेत. मृणाल ठाकूरला कोणी अटक केली? आणि का केली? खरंच अटक झाली का? असे अनेक प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे.
या व्हिडिओमध्ये मृणाल एकटी नाही तर तिच्यासोबत प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप देखील दिसत आहेत. विशेष म्हणजे मृणालच्या हातातील बेड्या अनुराग कश्यपने पकडलेल्या दिसतात. सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून कोणालाही धक्का बसेल पण हळूहळू या सगळ्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
advertisement
प्रत्यक्षात मृणाल ठाकूरला अटक झालेली नसून हा सगळा प्रकार डकैत: ए लव्ह स्टोरी या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे. 10 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.  सिनेमाच्या प्रमोशनसाठी ही भन्नाट स्ट्रॅटेजी राबवण्यात आली आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरसोबत अनुराग कश्यपही अभिनय करताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघांची ही अनोखी एन्ट्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
advertisement
व्हिडिओमध्ये अभिनेता शैनील देव देखील दिसत असून तो खूपच आनंदी आणि रिलॅक्स मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे काळ्या साडीत मृणालचा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा ग्लॅमरस आणि दमदार अंदाज चाहत्यांना विशेष आवडला आहे.
व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, "लोकांचं हृदय चोरण्यासाठी अटक केली आहे." तर दुसऱ्यानं लिहिलंय, "अटक झाल्यानंतर इतकी खुश कशी दिसते?" तर काहींनी "फ्लॉप चित्रपटासाठी काहीही करतात" अशाही कमेंट्स केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mrunal Thakur : मराठमोळ्या मृणाल ठाकूरला 'अटक'! हातात बेड्या, पोलीस व्हॅनमधून बाहेर येतानाचा Video व्हायरल, भानगड काय?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement