'माझा श्वास गुदमरतोय', 'चंद्रमुखी चौटाला'मुळे अभिनेत्रीला सहन करावा लागतोय त्रास, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Hindi TV Actress: टीव्ही विश्वात अनेक अभिनेत्रींनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांना त्यांच्या एका विशिष्ट पात्रामुळे त्यांच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
असाच काहीसा प्रकार अभिनेत्री कविता कौशिकसोबत घडला. कविताने हिंदी मालिका विश्वातील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक असलेलं 'चंद्रमुखी चौटाला' ही भूमिका साकारली होती. सब टीव्हीवर अनेक वर्षे FIR या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यातील चंद्रमुखी चौटाला या पात्राने कविताला वेगळी ओळख मिळवून दिली.
advertisement
advertisement
advertisement
कविताने टीव्ही इंडस्ट्रीतील काही वास्तविक गोष्टींकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ती म्हणाली, "जशी माझी पर्सनॅलिटी आहे, तसे रोल आज टीव्हीवर मिळणं कठीण आहे. मी ना आदर्श सून वाटते, ना सासू. ३०-३५ या वयोगटातील अभिनेत्रींसाठी चांगले रोल मिळवणं सध्याच्या घडीला खूप कठीण झालंय. त्यांना सरळ सासू बनवतात आणि सुनेच्या आयुष्यात विष कालवण्याचं काम देतात. मी अशा भूमिका केल्या, तर प्रेक्षकही मला हलक्यात घेतील."
advertisement
advertisement
FIR मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर कविताला अनेक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकांच्या ऑफर्स आल्या, पण तिने त्या नाकारल्या. यामागचं कारण देत ती म्हणाली, "'चंद्रमुखी चौटाला' ही भूमिका माझ्या इतर सर्व भूमिकांवर भारी पडते. मी अनेक सिनेमे केले, पण आजही लोक मला त्याच नावाने हाक मारतात. मला आनंद होतो, पण मला त्याच रोलमध्ये अडकून पडणं गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. मला स्टीरियोटाइप व्हायचं नव्हतं."
advertisement
तथापि, कविता आता अ‍ॅमेझॉन एमएक्स प्लेअरच्या 'कप्तान' (Kaptan) या वेब सीरिजमध्ये पुन्हा एकदा पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हा रोल तिने सहज स्वीकारलेला नाही. सुरुवातीला तिने या रोललाही नकार दिला होता. पण जेव्हा तिला भूमिकेची खोली आणि वेगळेपण समजलं, तेव्हा तिने हा प्रोजेक्ट स्वीकारला.
advertisement










