Rohit Sharma : रोहितला वर्ल्ड कप जिंकवणारा हिरो... IPL मध्ये त्याच्यासाठीच ठरतोय व्हिलन!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली : आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीच्या संथ खेळपट्टीवर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 162 रन केल्या. मुंबईकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 36 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली, तर रोहित शर्माने 26 बॉलमध्ये 35 रन केले. पहिल्या सामन्यात 78 आणि आता 35 रन करणाऱ्या रोहितकडे आता सर्वाधिक रन केल्यामुळे ऑरेंज कॅप आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित पुन्हा एकदा मोठा स्कोअर करेल असं वाटत होतं, पण अक्षर पटेलने रोहितची विकेट घेतली. अक्षर पटेलने या सामन्यातून पुन्हा एकदा तो रोहितसाठी न सुटणारं कोडं असल्याचं दाखवून दिलं.
बापूविरुद्ध हिटमॅनची आकडेवारी
रोहित शर्माची अक्षर पटेलविरुद्धची आकडेवारी पाहिली तर अक्षरने रोहितविरुद्ध वर्चस्व दाखवून दिल्याचं स्पष्ट होतं.
इनिंग : 12
advertisement
रन : 102
बॉल : 103
आऊट : 5 वेळा
सरासरी : 20.4
स्ट्राईक रेट : 99.02
डॉट बॉल टक्केवारी : 40 %
ही आकडेवारी पाहून रोहित शर्मा इतर बॉलरना अगदी सहज टोलवतो, पण अक्षर पटेलच्यासमोर त्याचा स्ट्राईक रेट चक्क 100 च्या खाली येतो.
कसा आऊट झाला रोहित?
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने 26 बॉलमध्ये 35 रन काढल्या होत्या, ज्यात 5 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता, पण 10व्या ओव्हरला अक्षर पटेल बॉलिंगला आला आणि त्याने मॅचचं चित्र बदलून टाकलं.
advertisement
दिल्लीच्या संथ खेळपट्टीवर अक्षर पटेलने बॉल हळू आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर रोहितने कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण कव्हरवर उभ्या असलेल्या नितीश राणाने कोणतीही चूक न करता हवेत झेप घेऊन रोहितचा उत्कृष्ट कॅच घेतला आणि रोहितची खेळी संपुष्टात आली.
रोहितसाठी अक्षरचा धोका
रोहित शर्माला अक्षर पटेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 5 वेळा आऊट केलं आहे. अक्षरची शैली बॉल सरळ लाईनमध्ये टाकण्यावर भर देते, ज्यामुळे रोहितला मोठे फकटे मारताना अडचणींचा सामना करावा लागतो. अक्षरसमोर रोहितने 40 टक्के डॉट बॉल खेळले आहेत, ज्यामुळे रोहितवर मोठा शॉट मारण्याचा दबाव वाढतो आणि यातच तो आपली विकेट गमावतो.
advertisement
रोहितच्या विकेटनंतर मंदावली मुंबईची बॅटिंग
रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर मुंबई इंडियन्सची बॅटिंग मंदावली आणि 20 ओव्हरमध्ये मुंबईला 162 रनपर्यंतच मजल मारता आली. रोहित जर आणखी वेळ टिकला असता तर मुंबईला आणखी मोठा स्कोअर करता आला असता.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Apr 04, 2026 6:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहितला वर्ल्ड कप जिंकवणारा हिरो... IPL मध्ये त्याच्यासाठीच ठरतोय व्हिलन!








