advertisement

IPL 2026 : सगळ्यांच्या मनात होता तो प्रश्न,कुणाची हिंमत नाही, त्याने थेट कोहलीलाच विचारलं काय होता रिप्लाय?

Last Updated:

खरं तर कंटेट क्रिएटर मिस्टर नाग्सने विराट कोहलीची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला होता.खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून हाच प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारताय.

MR Nags virat kohli
MR Nags virat kohli
Virat kohli News : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि आरसीबीचा प्लेयर रोहित शर्मा मैदानात नेहमी खेळाडूंसोबत मजामस्ती करताना दिसतो.एकंदरीत तो मैदानात प्रचंड कूल असतो, मैदानात नाचतो काय, चाहत्यांना एंटरटेन करतो काय? अशा सगळ्या मुडमध्ये तो मैदानात असतो. पण एका मुलाखतीत तो प्रचंड भडकला आहे. त्यामुळे मुलाखतीत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर कंटेट क्रिएटर मिस्टर नाग्सने विराट कोहलीची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला होता.खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून हाच प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारताय. त्यामुळे हाच प्रश्न मिस्टर नाग्सने विराट कोहलीला विचारला होता. खरं तर आयपीएलमध्ये एका टीममधून फक्त 4 ओव्हर्सीस प्लेअर खेळवण्याचा नियम आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 5 ओव्हर्सीस प्लेअर खेळवते ? असा सवाल कोहलीला विचारण्यात आला होता.
advertisement
विराट कोहलीने टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो वनडे फॉरमॅटमध्ये खेळतो आहे. पण सध्या वनडे मालिका नसल्याने तो आपल्या लंडनच्या घरी राहतो.विराट सोबत त्याची बायको आणि त्याची मुलगी देखील तिथेच राहते. एकंदरीत विराट कोहली लंडनला राहतो म्हणून आरसीबी 5 ओव्हर्सीस खेळाडूंना मॅचमध्ये खेळवते, असा सवाल मिस्टर नाग्सने विचारला होता.
advertisement
लोकं म्हणतायत आरसीबी 5 ओव्हर्सीस प्लेअर खेळवते, पण मला काय कळत नाही ते काय बोलतायत ते, मिस्टर नाग्स हे बोलताच पहिल्यांदा विराट कोहली जोरजोरानो हसतो. नंतर म्हणतो, मला कळत नाहीये तुम्ही मला हा प्रश्न का विचारत आहात? तुम्ही ओव्हर्सीस प्लेअर्सना विचारा ना? मी काय ओव्हर्सीस प्लेअर नाही आहे, असे बोलत तो मिस्टर नाग्सला विचारतो, मी ओव्हरसीस प्लेअर आहे का? यावर तो देखील नकार देतो.
advertisement
गेल्या महिन्यात, कोहलीने आयपीएल २०२६ दरम्यान भारत आणि लंडन दरम्यान प्रवास करण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची मागणी केल्याच्या खोट्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. या वृत्तानुसार, जेव्हा सामन्यांमध्ये तीन दिवसांपेक्षा जास्त अंतर असेल तेव्हा त्याला मायदेशी परतायचे होते. तथापि, आरसीबीच्या माजी कर्णधाराने, आता डिलीट केलेल्या त्या पोस्टचा स्क्रीनशॉट 'खूप हसण्याच्या' इमोजींसह आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हे वृत्त फेटाळून लावले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : सगळ्यांच्या मनात होता तो प्रश्न,कुणाची हिंमत नाही, त्याने थेट कोहलीलाच विचारलं काय होता रिप्लाय?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement